Breaking News

छावणीचा शिल्लक राहिलेला निधी तात्काळ देण्यात यावा - डॉ. राजेंद्र बंड

 

     बीड :  सन 1019 मध्ये निसर्ग च्या अवकृपा मुळे महाराष्ट्र राज्य मध्ये दुष्काळ पडला होता व त्या वेळी शासनाने सामाजिक संस्था ना शेतकऱ्यांचे पशुधन जगावे म्हणून व शेतकरी ला दिलासा देण्यासाठी चारा छावण्या सुरू करून चालवण्यासाठी परवानगी दिली होती.

त्या वेळी शेतकऱ्यांना दिलासा व शासन ला सहकार्य म्हणून सेवाभावी संस्था नि पुढाकार घेऊन स्व खर्चाने चारा छावण्या चालू केल्या व ज्या वेळी शासन निधी देण्यात विलंब केला तरी सामाजिक संस्था नि इतरांकडून हातउसने पैसे घेऊन चारा छावण्या चालूच ठेऊन शेतकरी ना दिलासा दिला व शासकीय यंत्रणा ना मदत केली होती. व नंतर काही दिवसांनी शासन ने संस्था चा निधी उपलब्ध करून दिली आहे.आज छावण्या बंद होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत तरी शिल्लक राहिलेला निधी आजपर्यंत दिलेला नाही. 

  परंतु निधी देतांना काही रक्कम शासनाने आपल्या कडेच ठेऊन घेतली आहे जी आजपर्यंत दिली नाही. तसेच त्या वेळी मा. जिल्अधिकारी यांनी आम्हाला 50 जनावरे हालचाल रजिस्टर वरील गृहीत धरले जातील असे असावासन दिले होते, परंतु ते काही पाळले गेले नाही व नंतर जनावरांची संख्या कमी भरली म्हणून दंड आकारणी केलेली आहे.

तरी न जाणो भविष्यात निसर्ग च्या अवकृपा न अशी परिस्थिती निर्माण झाली तर कुठल्याही परिस्थितीत सामाजिक संस्था पुढाकार घेणार नाहीत. त्यामुळे  जिल्अधिकारी यांनी दुष्काळ परिस्थिती मध्ये  शासनाने केलेल्या आव्हाहन ला सक्षम पणे पुढाकार घेऊन छावणी ज्या संस्था नि चालवले आहेत त्यांची शिल्लक राहिलेली रक्कम व आकारलेला दंडाची रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी विनंती करण्यात येत नाही. या मागणीचे निवेदन मा. निवासी उपजिल्हाधिकारी यांना देताना डॉ. राजेंद्र बंड, हनुमान जगताप, बाळासाहेब हावळे, बाबू बहिरवाल, हिरामण शिंदे, सह आदी.

No comments