Breaking News

परळीचे भाजी मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्य क्षेत्रात घ्या : संभाजी ब्रिगेडची सभापती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


परळी वैजनाथ :  भाजीपाला मार्केट (बीट) परळी या ठिकाणी शेतकऱ्यांची दिवसाला लाखो रुपयांची लूट होत असून, ही लुट तात्काळ थांबविण्यात यावी व भाजीपाला मार्केट हे कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रा अंतर्गत घेण्यात यावे अशा संबंधीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  यांना देण्यात आले. 

गेल्या 18 तारखेला संभाजी ब्रिगेडच्या वतीने भाजीपाला मार्केट च्या संदर्भात लेखी स्वरूपाचे निवेदन कृ. उ.बा. समिती, सहाय्यक निबंधक कार्यालय ,तहसील कार्यालय परळी, नगरपालिका परळी, यांना देण्यात आले होते. या सर्व कार्यालयांनी संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाची दखल घेऊन लेखी स्वरूपात उत्तर दिले . भाजीपाला मार्केट हे आमच्या कार्यक्षेत्रात येत नसून त्यावरती आम्ही कुठल्याही प्रकारचं नियंत्रण लावू शकत नाहीत .ही बाब खूप गंभीर असून याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांची लाखो रुपयाची दिवसाकाठी लूट होत आहे ही लूट तात्काळ थांबली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुढील पाऊल उचलले असून आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली.  भाजीपाला मार्केट हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात घेण्यात यावे. जेणेकरून 2014 चा शासनाचा आदेश आहे की शेतकऱ्यांकडून कसल्याही प्रकारचे कमिशन घेऊ नये ते आदेशाचे पालन होईल आणि शेतकऱ्यांची होणारी लूट थांबेल अशा पद्धतीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने सभापती साहेब यांना देण्यात आले. आज भाजीपाला मार्केट बिट कोणत्याही वरील कार्यालयाच्या अंतर्गत येत नसल्यामुळे शेकडा 10% टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होत असून ही लूट तात्काळ थांबून यावरती कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्ग काढावा.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन स्वीकारताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. गोविंद फड संजय गांधी निराधार समिती चे तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेभाऊ पौळ याच्यासह संचालक मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांना देताना. संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवक्रम जाधव संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेव भालेराव सामाजिक कार्यकर्ते शिव श्री अरुण सपाटी शिवश्री पवन माने आदी उपस्थित होते.

No comments