Breaking News

आष्टी तालुक्याला उजनी बॅकवॉटरचे पाणी लवकरच मिळणार - आ.बाळासाहेब आजबे

आष्टी  :  तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आपण जीवाचे रान करत असून उजनी प्रकल्पाचे शिल्लक पाणी आपल्या आष्टी तालुक्यासाठी आवश्यक पाणी प्राप्त होणार आहे .यासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली असून येत्या काही दिवसात उजनी बॅकवॉटर चे पाणी आष्टी तालुक्याला लवकर मिलण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास आ.बाळासाहेब आजबे यांनी व्यक्त केला.

    आष्टी तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर आ.आजबे यांनी लोकांना संबोधीत केले .कार्यक्रमास मा.आ.भीमराव धोंडे ,मा.आ.साहेबराव दरेकर, जयदत्त धस ,ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक साहेबराव दादा थोरवे तहसीलदार शारदा दळवी आदी उपस्थित होते .यावेळी आजबे म्हणाले कि,पाणी प्रश्नावर आपण अतिशय गंभीर असून उजनी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर बॅकवॉटर चे शिल्लक पाणी आष्टी तालुक्यास मिळाल्यास आष्टी तालुक्यातील इंच इंच जमीन बागायती होऊ शकते .या संदर्भात आपण आमदार झाल्यानंतर केवळ तीनच महिन्यात सदर योजनेला पर्यावरण विभागाची मान्यता मिळवून दिली आहे .मराठवाड्याचे हक्काचे पाणी देण्यासंदर्भात देशाचे नेते खा.शरद पवार ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे वचनबद्ध आहेत .नुकतेच ना.जयंत पाटील यांनी याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेऊन या बाबत आढावा घेतला आहे .सदर पाणी कर्जत तालुक्यातील शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन द्वारे पुढे रुटी प्रकल्प व्हाया तलवार प्रकल्प असे टप्याटप्याने येईल.

या योजनेचा विस्तार होऊन आष्टी तालुक्याची पाण्यासाठीची वणवण थांबेल तसेच आष्टी शहर मुर्शदपूरकरांची तहान भागण्याच्या दृष्टीने या योजनेचं उपयोग होणार आहे .आजबे पुढे म्हणाले कि ,या बाबत आपण पत्रकारांना घेऊन योजनेची स्थळ पाहणी करणार आहोत .ना.जयंत पाटील यांच्यासह मंत्रालयात बैठक लावणार असून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याला आपले प्राधान्य असेल त्यासाठी सर्व राजकीय नेत्यांचे सहकार्याची गरज आहे असे ते म्हणाले .मा.आ .भीमराव धोंडे यांनी पाणी प्रश्नावर मनोगत व्यक्त करून आपले हक्काचे पाणी मिळावे त्यासाठी आम्ही जलसंपदा मंत्री जयंत पाटील ,खा .शरद पवार यांना भेटू असे मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमास नायब तहसिलदार प्रदीप पांडुळे, निलिमा थेऊरकर ,सभापती बद्रीनाथ जगताप ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी ,सरपंच परिषदेचे दत्ता काकडे ,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब लटपटे ,काकासाहेब शिंदे ,शंकर देशमुख ,साहेबराव म्हस्के ,आदिनाथ सानप ,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 


No comments