Breaking News

ट्रान्सफार्मर जळाल्याने कान्होबाचीवाडी,कोळवाडी, येंळब अंधारात


विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडुन शेतकऱ्यांची हेळसांड

भारत पानसंबळ । शिरुर 

शिरुर तालुक्यातील शेतकरी सध्या शेतामध्ये रब्बीचे पिके घेण्याचे काम करीत असुन.व काही गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील रब्बी हंगामातील पिके जसे उन्हाळी बाजरी, मका, हरभरा, गहु असे पिके घेतलेली आहेत.तर शिरुर तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पुर्ण करुन घेण्याचे कामही सध्या सुरु असुन कान्होबाचीवाडी, कोळवाडी, शिरुर, वारणी, दहिवंडी, राक्षसभुवन, व्हरकटवाडी, येंळब गावामधील अर्धा शिवारातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहु, हरभरा, मका, उडीद, मुग, ऊस, बाजरी पेरण्याचे काम पुर्ण झाले.पेरण्या पुर्ण केल्यानतंर गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्या सबस्टेशन मार्फत लाईट चा पुरवठा सुरु होता.

त्या सबस्टेशन वरील ट्रान्सफार्मर दिनांक 5 जानेवारी रोजी जळाल्यामुळे लाईटच अध्याप पर्यंत बंद आहे.शेतकऱ्यांनी शेतात घेतलेल्या पिंकाना पाणी देण्यासाठी लाईटच उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची उगवुन आलेली  पिके जळुन आता चालली आहेत.या भागामधील लाईट गेलेली तब्बल दहा दिवस पुर्ण होवुन गेले आहे.तरी देखील अधिकाऱ्यांनी जळालेले ट्रान्सफार्मर च्या जागी नवीन ट्रान्सफार्मर आनुन बसविले नाही.त्यामुळे शेतकरी हवालदिल होवुन मेटाकुटीला आला आहे.विद्धुत महावितरण कंपनीचे अधिकारी जानुन बुजुन शेतकऱ्यांची हेळसांड करत आहेत. शेतातील पिकांना जगवण्यासाठी विहिरी, बोअर, तलावामध्ये पाणी उपलब्ध आहे.


पण शेतामध्ये लाईटच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी घेतलेली पिके जळायला सुरु झाली आहेत.कान्होबाचीवाडी गावातील शेतातील पेरलेल्या पिकांना लाईट उपलब्ध होत नसल्याने पिकांना एकदाही पाणी देता आले नाही.दहा दिवसांन पासुन संपुर्ण गाव अंधारात आहेत.तरीही विद्युत महावितरण कपंनीच्या अधिकाऱ्यांना नवीन ट्रान्सफार्मर बसवण्यासाठी उपलब्ध होईना.

पाण्या अभावी पिके जळू लागली शेतकरी-गणेश अशोक भांडेकर

शेतातील पिंकाना पाणी उपलब्ध असुन देखील लाईट नसल्यामुळे पाणी देता आले नाही.त्यामुळे पिके जळुन गेली आहेत.लाईट गेलेली आज दहा दिवस होऊन गेले आहे.तरीही अधिकार्यांना याच गांभीर्य राहिलेल नाही.जो पर्यंत नवीन ट्रान्सफार्मर उपलब्ध होत नाही.तो पर्यंत अधिकाऱ्यांनी पर्यायाने दुसऱ्या ठिकाणाहून शेतकऱ्यांना लाईट उपलब्ध करुन द्यावी.व दररोज किमान 5 तास जास्तीच्या दाबाने लाईट सोडावी.

लाईट नसल्याने पिकांना पाणी देता येईना - शेतकरी लक्ष्मण सर्जेराव जाधव

कान्होबाचीवाडी गावातील लाईट 5 तारखेला गेली होती.आज 17 तारीख आहे. आणखीनही लाईट आलेली नाही.शेतामध्ये रब्बीचे पिके उन्हाळी बाजरी घेतले होते.त्या पिकांना पाणी वेळेवर न दिल्याने पिके आता जळुन चालली आहेत.शेतातील पिंकाना जगवण्यासाठी पाणी उपलब्ध असुनही लाईट नसल्यामुळे पाणी देता येईना. कोरड्या शेतामध्ये बाजरीला युरीया मारला आहे.अधिकारी लाईटच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही.लाईटची जर अशीच परिस्थिती राहीली तर आम्हां शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ हे आधिकारी आमच्यावर आणल्या शिवाय राहणार नाही.

नवीन ट्रान्सफार्मर येण्यासाठी वेळ लागतो -इंजिनियर.बोरखेडे

नवीन ट्रान्सफार्मर हे औरंगाबाद येथुन आणावे लागते.चार ते पाच दिवस नवीन ट्रान्सफार्मर येण्यासाठी वेळ लागेल.तो पर्यंत पर्यांयी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांना दररोज दोन तास लाईट दुसरी कडुन उपलब्ध करुन देऊ

No comments