Breaking News

शिरूर तालुका पत्रकार संघातर्फे दर्पण दिन व प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आजोळ परिवारात निराधारांना फळसाहित्याचे वाटप!


शिरुर कासार : तालुक्यातील राक्षसभुवन तालुका पत्रकार संघाचे वतीने दर्पण दिन व प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आजोळ परिवारात वृद्ध, अपंग ,निराधार, बेघर ,अनाथ यांना दर्पण दिनाचे औचित्य साधून फळसाहित्यांचे वाटप आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त बुधवार (दि.६) दर्पण दिन व पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने प्रमुख पाहूने साहित्यिक अनंत कराड निवासी संपादक नवनाथ येवले हे होते.

 यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष भारत पानसंबळ सूचक राज कातखडे यांनी अनुमोदन दिले प्रस्ताविक आजोळ चे लतीफ सय्यद सर व जेष्ठ पत्रकार विजयकुमार गाडेकर , गोकुळ पवार यांनी मनोगत व्यक्त केले तर आजोळ परिवाराचे संचालक करण तांबे यांनी केले, यानंतर वृद्ध निराधार ,दिव्यांग,बेघर यांना फळसाहित्य वाटप करण्यात आले.यावेळी पोलीस कर्मचारी मारुती केदार, मुंडे, तर जेष्ठ पत्रकार बबन देशमुख, अशोक भांडेकर, युवराज सोनवणे, चंद्रकांत राजहंस,जगन्नाथ परजने, अशोक शिंदे, सतीश मुरकुटे, शंकर भालेकर, दिगंबर गायकवाड,मनोज परदेशी, प्रमोद निकम, सुनील जेधे, रामेश्वर क्षीरसागराले, गौतम औसरमल, अंबादास गोरे, बाळकृष्ण मंगरूळकर, आशिष गाडेकर, विष्णू सव्वाशे, विकास पाटील,आदी पत्रकाराची उपस्थिती होती. तर संतोष कांबळे, अनिल गाडेकर यांच्यासह नागरीकांची उपस्थिती होती.आजोळ परिवाराने पत्रकाराचा सन्मान करण्यात आला.

नागेबाबा मल्टीस्टेस्ट व सेवाश्रम येथे दर्पण दिन साजरा

शहरातील नागेबाबा मल्टीस्टेस्ट  व ब्रम्हनाथ येलंब येथील सेवाश्रम येथे दर्पण दिन साजरा यावेळी नागेबाबा चे सर्व कर्मचारी उपस्थित होते व सेवाश्रम येथे शांतीवनचे नागरगोजे, व सेवाश्रमचे सुरेश राजहंस, मयुरी राजहंस यांनी दर्पणदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी येथील सर्व कर्मचारी यांनी पत्रकाराचा सन्मान करण्यात आला.

No comments