Breaking News

बहन मायावतींचा जीवन संघर्ष बहुजनांची प्रेरणा– ऍड. अमोल डोंगरे

माजलगाव :   बहन कु.मायावतीजी यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिन व आर्थिक सहयोग दिवस म्हणून शासकीय विश्रामगृह बीड येथे बहुजन समाज पार्टी चे बीड जिल्हा अध्यक्ष ऍड अमोल डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना ऍड अमोल डोंगरे म्हणाले की, उत्तरप्रदेश च्या मुख्यमंत्री  आयरण लेडी मायावतीजी यांचा शिक्षक ते चार वेळा मुख्यमंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी हा प्रवास चळवळशी आणि फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेशी प्रमाणिक राहून सचोटीने व जिद्दीने इथ पर्यंतपूर्ण केला आहे. या देशातील शोषित, पिडीत, वंचीत समाज आरण लेडी बहन कु.मायावतीजी यांना भारत देशाची भावी प्रधानमंत्री म्हणून बघत आहे.मायावतीजींच्या ६५ व्या वाढदिवशीपासून जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी करून मायावती यांचे हात बळकट करणार असे ऍड.अमोल डोंगरे म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीड विधानसभा अध्यक्ष राजनिकांत वाघमारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन बीड जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती  प्रदेश सचिव डॉ.अनंत गायकवाड, मराठवाडा प्रभारी प्रशांत वासनिक, जिल्हा प्रभारी  सतिश कापसे,जिल्हा प्रभारी संजय मिसाळ, जिल्हा कोषाध्यक्ष अनिल सिरसट, जिल्हासचिव संजय हराळ, जिल्हासचिव विष्णू गाडेकर, जिल्हासचिव चंदरलाल बनगे, जिल्हासचिव सागर हनवते, विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब आडागळे, विधानसभा अध्यक्ष राहुल सिरसट, विधानसभा अध्यक्ष अरविंद लोंढे, विधानसभा अध्यक्ष ऍड.बुध्दरत्न उजगरे, विधानसभा अध्यक्ष धम्मानंद आचार्य, माजलगाव विधानसभा कार्यालयीन सचिव हरिभाऊ साळवे हे होते.

No comments