Breaking News

कुलस्वामिनी भंडारे भगवद्गीता १२ अध्याय पाठांतर स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम


माजलगाव : गीता जयंती निमित्त, मराठवाडा गीता परिवार आयोजित  प्राथमिक गटासाठी श्री भगवद्गीता १२ अध्याय पाठांतर स्पर्धेत येथील कु कुलस्वामिनी शिवशंकर भंडारे (वय १० वर्षे)  हिने बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तिची निवड विभागीय पातळीवर झाली आहे. 

     कुलस्वामिनी  भंडारे हिने भगवद्गीतेचे १ ते १८ अध्याय मुखोद्गत केलेले आहे.   या स्पर्धेत तिने मिळवलेल्या यशाबद्दल  तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिला संस्कृताचार्य ह.भ.प. आदिनाथ शास्त्री कुंडकर महाराज यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

No comments