Breaking News

इंधन बचत ही काळाची गरज : प्राचार्य डॉ. निंबोरे


आष्टी :
बचतीची सवय आपण आपल्या घरापासून लावली पाहिजे.गृहिणींनी स्वयंपाक घरात सर्व वस्तूंची जमवाजमव केल्यानंतरच  गॅस पेटवावा.

 ही सुद्धा इंधन बचतीची नांदी आहे. सिग्नलवर गाडी चालू ठेवू नये. बसस्थानकवर जास्त काळ गाडी चालू ठेवू नये. वेळेवर सर्विसिंग अवश्य करावी. त्यामुळे इंजिनामध्ये कार्यक्षमता वाढते. चीन सारख्या देशात जड वाहतुकीचे ट्रक सोडले तर, इलेक्ट्रिक गाड्या मोठ्या संख्येने उपलब्ध केलेल्या असतात. सोलर उर्जेला ही प्राधान्य देण्याची गरज आहे. मुळात जास्त  प्रवाशांना घेऊन जाणारी बस ही इंधन बचतीची  संजीवनीच असते. एकूणच इंधन बचत ही काळाची गरज आहे.असे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,बीड विभाग यांच्या वतीने दिनांक 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी  2021 पर्यंत इंधन बचत महिना पाळला जातो आहे,त्यानिमित्तच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत नांगरे यांनी केले. 

यांत्रिक कर्मचारी व चालक यांच्यातील जायभाये, देशपांडे, गांगर्डे, तोटे, लाड, वारंगुळे या चालक,कर्मचाऱ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष डोके यांनी इंधन बचत मासिक कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. हंबर्डे महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. अशोक भोगाडे, गोरख नागरगोजे, मुटकुळे सुनील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अधीक्षक शरद खोत यांनी सर्वांचे आभार मानले.


No comments