Breaking News

दर्पण दिन आणि मुकनायक दिनानिमित्त आदर्श पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर


विजय हमीने, उत्तम हजारे, अभिमन्यू घरत, उदय नागरगोजे, उमेश जेथलिया व मनोज गव्हाणे यांचा होणार सन्मान

केज : प्रतिवर्षी प्रमाणे जानेवारी महिन्यात दर्पणदिन व मुकनायक दिनाचे औचित्य साधून आदर्श पत्रकार समिती केजच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील विशेष आणि उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा आदर्श पत्रकार समितीच्या वतीने करण्यात आली. यात विजय हमीने, उत्तम हजारे, अभिमन्यू घरत, उदय नागरगोजे, उमेश जेथलिया व मनोज गव्हाणे यांचा समावेश असून हे पुरस्कार मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिले जाणार आहेत. तसेच कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी स्वतःच्या जिवाची देखील तमा न बाळगता चाकोरी बाहेर जाऊन जोखमीचे कार्य केले त्या बद्दल तहसीदार दुलाजी मेंढके आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांना विशेष आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.


मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या केज तालुका आदर्श पत्रकार समितीच्या वतीने दि ३१ जानेवारी रोजी दर्पण दिन आणि मुकनायक दिन या निमित्त पत्रकारिता क्षेत्रात विशेष व गौरवास्पद कायमगिरी करणाऱ्या पत्रकारांचा मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख व सामाजिक क्षेत्रातील गौतम खटोड, उपजिल्हाधिकारी शरद झाडके व अँड. देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत सचोटीने आणि स्वतःचे मोठेपण पत्रकातीता करणारे विजय हमीने यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे.तसेच दै. लोकशाचे निवासी संपादक उत्तम हजारे हे पत्रकारिता क्षेत्रात एक अभ्यासू आणि जेष्ठ पत्रकार आहेत त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. दै हिंदजागृतीचे संपादक अभिमन्यू घरत यांना आदर्श संपादक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. 


तर उमेश जेथलिया यांना दिवंगत मोहन भोसले  स्मृती निर्भीड पत्रकारिता पुरस्कार आणि दिवंगत सुनील देशमुख स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार दै. पुढारीचे नेकनूर तालुका प्रतिनिधी मनोज गव्हाणे यांना देण्यात येणार आहे तसेच कोरोना कालावधी मध्ये विशेष कामगिरी करणारे केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी तमा न बाळगता नागरिकांना संसर्ग होऊ नये म्हणून अहोरात्र रस्त्यावर उतरून काम केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले यांचे कार्यही उल्लेखनिय असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना केअर सेंटर केज येथील रुग्ण बरे होण्याचा दर समाधानकारक राहिला. म्हणून त्यांनाही आदर्श सेवा पुरस्कार दिला जात आहे. या पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष विजयराज आरकडे यांनी दिली आहे.





No comments