Breaking News

श्री स्वामी समर्थ नागरी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनपरळी वै. : येथील श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पतसंस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

       परळी शहरातील छोटे, सर्वसामान्य व्यापारी व कष्टकर्‍यांची आधार बनत चाललेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पहिल्यांदाच सुबक व आकर्षक दिनदर्शिका काढण्यात आली. मंगळवारी (ता.12) पतसंस्थेच्या कार्यालयात दिनदर्शिकेचे प्रकाशन पतसंस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे सचिव लक्ष्मण वाकडे, उपाध्यक्षा प्रा.सुनिता वाघमोडे, संचालक शिवाजी खाडे, राजाभाऊ आढाव, सचिन मुंदडा, धिरज जंगले, व्यवस्थापक प्रकाश चव्हाण, बसवेश्वर खोत यांच्यासह कर्मचारी, पिग्मी एजंट उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदिप राठोड, रमेश बागवाले व राजेश शेटे यांनी परिश्रम घेतले.

No comments