Breaking News

उपविभागीय आयुक्त कार्यालयावर ब्राम्हण समाज संघर्ष समितीच्या वतीने पळी-ताम्हण बजाव आंदोलन

आंदोलनाला सेनेचे उपनेते माजी खा चंद्रकांत खैरे आणि आ. अतुल सावे यांची भेट

गौतम बचुटे । केज : औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालया समोर ब्राम्हण समाज संघर्ष समितीच्या वतीने धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखी विविध प्रलंबित मागण्यासाठी पळी-ताम्हण बजाव आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे आणि आ अतुल सावे यांनी भेट देऊन मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत या मागण्या पोहोचवू असे आश्वासन दिले.

या बाबतची माहिती अशी की, दि..२२ जानेवारी रोजी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालया समोर धनंजय कुलकर्णी, दीपक रणनवरे, विजयाताई कुलकर्णी, विजयाताई अवस्थी, प्रमोद पुसरे, श्रीराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आपल्या न्याय मागण्यांसाठी पाळी ताम्हण वाजवून आंदोलन केले. त्यांच्या मागण्या या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे.  ब्राम्हण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे. 

 समाजातील तरुणांना शैक्षणिक, व्यवसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन महामंडळाला १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह स्थापन करण्यात यावे. के जी टु पी जी शिक्षण मोफत करण्यात यावे. समाजावर केल्या जाणाऱ्या बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीविरुध्द ॲट्रॉसिटी कायद्या सारखा तत्सम कायदा करुन कारवाई करण्यात यावी. पुरोहित समाजाला मासिक ५००० रु. मानधन सुरु करण्यात यावे. कुळात गेलेल्या जमीनी परत देण्यात याव्यात. आंदोलनात औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, उस्मानाबाद, जालना, लातूर या जिल्ह्यातील समाज बांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.No comments