Breaking News

'एमपीजे' चे परळीत उदघाटन


परळी :
72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राणी लक्ष्मीबाई टावर ते  नेहरू चौक (तळ) रोड येथील कच्छी काॅम्पलेक्स गाळा क्र.3 मध्ये एम.पी.जे. कार्यालयाचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्त गट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा शहरातील 180 नागरिकांनी  लाभ घेतला. सदरील कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून परळी नगर परिषदेचे  माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, परळी वै. संभाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. मरल साहेब, नगर सेवक अजीज कच्ची, परळी जमाअत-ए-इस्लामीचे अध्यक्ष सय्यद अनवर सर तसेच एम.पी.जे.चे बीड जिल्हा अध्यक्ष सय्यद सबाहत अली यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोव्हीड  विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लावण्यात आलेल्या लाॅकडाऊन काळात मोलमजुरी करणार्या, हातावर पोट असणाऱ्या आपल्या शहरातील शेकडो लोकांचे हाल झाले. या संकट समयी विविध सामाजिक उपक्रम राबवल्या बद्दल मान्यवरांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे तसेच पदाधिकार्यांचे सदरील कार्यासाठी कौतुक केले. विविध सामाजिक हीतोपयोगी कार्यक्रम राबवणार्या या संघटनेस मान्यवरांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम.पी.जे. परळी वै. चे शहराध्यक्ष सय्यद मिनहाज़, उपाध्यक्ष सय्यद अब्बास,सचिव अब्दुल हाफीज, अबुज़र खान, अरबाज़ खान, आदीलभाई, वसीमभाई व सर्व एम.पी.जे परळी वै. संघाने परिश्रम घेतले.


No comments