Breaking News

सोनिजवळाच्या युवकांनी घेतली बालविवाह न करण्याची आणि होऊ न देण्याची शपथ

गौतम बचुटे । केज  

बालविवाह रोखण्यासाठी कोरो संघटनेच्या प्रेरणेने केज तालुक्यातील सोनिजवळा येथे युवकांनी एक कार्यक्रम आयोजित करून त्यात बालविवाह होऊ देणार नाही आणि बालविवाह करणार नाही अशी शपथ घेतली.


सोनिजवळा ता. केज येथे युवकांनी युवा दिनाचे औचित साधून बालविवाहाला आळा घालण्यासाठी स्वतःच्या घरी बालविवाह होऊ देणार नाही आणि स्वतः कमी वय असलेल्या जोडीदारा बरोबर विवाह करणार नाही. अशी शपथ घेत समाजा समोर आदर्श निर्माण केला आहे. तीन वर्षां पासून महिला व बालअधिकारी या विषयावर काम असलेल्या कोरो संघटनेकडून ही प्रेरणा मिळाली. गावात बालविवाह होऊ नये यासाठी पुढाकार घेऊन. युवा दिनानिमित्त तरुणांनी अशी शपथ घेतली की, बालविवाह करणार नाही आणि होऊ देणार नाही. यावेळी कोरोचे कार्यकर्त्या रोहिणी खरात,  अनिता खंडागळे तसेच गावातील युवक  विशाल पंडित, नितीन राऊत, आशुतोष गिरी, सज्जाद शेख, ज्ञानेश्वर पवार, करण उजगरे, सुमित पंडित, अभिजित जोगदंड, रितेश भाडवलकर, हनुमंत भांडवळकर, आभिषक चव्हाण, प्रशांत वैरागे इत्यादी उपस्थित होते.


No comments