Breaking News

दलित वस्ती सूधार योजना निधित करोडोचा घोटाळा !


गेल्या पाच वर्षाचा दलित विकास निधिचे कामे दाखवा आणि एक लाख रुपये बक्षिस मिळवा -विजय साळवे

माजलगांव :  येथील नगर परिषद कार्यालयात गेल्या पाच वर्षापासून दलित वस्ती सूधार योजनेचा कोट्यावधी रूपयाचा निधि शहरातील कोणत्या दलित वस्तीमध्ये वापरला याची माहीती द्या आणि स्वाभिमानि रिपब्लिकन पक्षाच्या वतिने एक लाख रूपयाचे बक्षिस मिळवा असे आव्हाण पक्षाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विजयदादा साळवे यांनी न.प. चे सत्ताधारी अधिकारी व जिल्हा प्रशासनाला केले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि. माजलगांव नगर परिषदेचे नगरसेवक तथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय साळवे यांनी न.प. कार्यालय व जिल्हा प्रशासनाला गेल्या चार वर्षापासून सातत्याने निवेदने व आंदोलने करुण दलित वस्ती सुधार योजनेचे पाच वर्षापूर्वी पासून प्रतिवर्षी आलेले करोडो रूपये दलित वस्तितच खर्च करा म्हणून सांगीतले.

 परंतु भ्रष्टाचाराचा कळस गाठलेल्या भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी मिळुण दलित वस्ती सूधार योजना निधिची कुठे विल्हेवाट लावली हे सांगायला कोणीही तयार नाही. परंतु आता आमच्या स्वाभिमानी कार्यकर्त्याचा आता संयमाचा बांध तुटला असुन दिनांक १२ जानेवारी रोजी न.प. प्रशासन व जिल्हा प्रसा सनास एका निवेदनाद्वारे स्वारिप च्या कार्यकर्त्यानी मा.न.प. कार्यालयातील गेल्या पाच वर्षात आलेल्या दलित विकास निधिची वरिष्ठ अधिकाऱ्या मार्फत चौकशी करा व भ्रष्ठाचारी सत्ताधारी, आधिकारी कर्मचारी , एजंन्सीज विरूध्द संघटित गुन्हेगारी अॅक्ट मोक्का, अॅट्रॉसिटी अॅक्ट सह भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करुण निधि परत द्यावा . या मागणि साठी न.प. कार्यालय माजलगांव समोर दिनांक.२५ जानेवारी रोजी बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल .असे निवेदन दिलेले आहे. व माजलगांव न.प. कार्यालयात गेल्या पाच वर्षात दलित वस्ती विकास निधिचा सविस्तर हिशोब दाखवावा आणि एक लाख रूपये बक्षिसाचे मानकरी व्हावे. असे आव्हाण स्वारिपचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विजयदादा साळवे यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे

No comments