Breaking News

माऊली पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमीत्त पेरे पाटलांच्या व्याख्यानास उपस्थित रहा - प्रा. वाळसकर

माजलगाव : माउली नागरी सहकारी पतसंस्थेने 15 वर्षांचा टप्पा पूर्ण केला असून पंधराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन पतसंस्थेच्या वतीने दि. 23/01/21 वार शनिवार रोजी सकाळी 11.00 वाजता आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले असुन उपस्थित रहावे असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन प्रा. दत्ता वाळसकर यांनी केले आहे. 

कार्यक्रमास उद्घाटक म्हणुन डाॅ. ओमप्रकाश शेटे हे तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मा. आ. बाजीराव भाउ जगताप, मा. आ.मोहनराव काका सोळंके, डाॅ. प्रकाश आनंदगांवकर, पत्रकार संघाचे जिल्हाअध्यक्ष तुकाराम येवले यांची उपस्थिती असणार आहे. ग्रामीण भागातील होतकरून महिलांसाठी शिलाई मशिनचे वाटप तसेच ग्राहकांच्या सेवेसाठी मोबाईल बॅंकींग अॅपचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन प्रा. दत्ता वाळसकर व संचालक मंडळ, सर्व कर्मचा-यांच्या वतीने करण्यात आले आहे.No comments