Breaking News

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद !


■ गरीब रुग्णांना मदत मिळत नाही हे दुर्दैव - आ.गोपीचंद पडळकर

दिंद्रुड : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात देवदूत ओमप्रकाश शेटे यांनी लाखो गरीब रुग्णांना मदत करुन अनेकांना जीवनदान दिले. मात्र या सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता  कक्ष बंद केल्यामुळे गरीब रुग्णांना मदत मिळत नाही हे दुर्दैव असल्याचे प्रतिपादन आमदर गोपीचंद पडळकर यांनी केले.

          अल्पावधीतच अभ्यासू व रोखठोक आमदार म्हणून लोकप्रिय झालेल्या आ. गोपीचंद पडळकर यांनी ओमप्रकाश शेटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पडळकर बोलत होते. यावेळी ओमप्रकाश शेटे यांच्यासह समाजकल्याण सभापती कल्याण आबुज, उद्योजक माधवराव निर्मळ, राजेभाऊ निर्मळ, माऊली हरणावळ, दिलीपराव मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

       देवदूत प्रतिष्ठानच्या वतीने संयोजक बंडू खांडेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. गोपीचंद पडळकर यांनी फडणवीस सरकारच्या काळात आरोग्यासाठी लाखो गरिबांना ओमप्रकाश शेटे यांनी सढळ हाताने मदत केल्याचे सांगितले. आरोग्य क्षेत्रात ओमप्रकाशजींनी राज्यभरात उभा केलेल्या कामाला तोड नसल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच कोरोना सारख्या महाभयंकर आजाराच्या साथीत लोकांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडण्याचे पाप केले असल्याचेही पडळकर म्हणाले.

        यावेळी महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान, सरपंच भगवान कांदे, विलास शेंडगे, बद्रीनाथ व्हरकटे, उत्तरेश्वर खताळ, कुस्तीगीर परिषदेचे मुरलीधर मुंडे, मारोती दूनगे, महादेव कुंडकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश ठोंबरे, नागेश कानडे, धनंजय कटारे, शिवाजी हंगरगे, पिंटू डीसले,राम देशमाने, संभाजी मुंडे, समाधान सोळंके, बाळासाहेब कावळे, आदींनी परिश्रम घेतले.

No comments