Breaking News

आष्टीच्या बी .फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फार्मासिस्ट म्हणून नोंदणीआष्टी :  आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मासिटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी (बी .फार्मसी)या कॉलेजची स्थापना संस्थापक अध्यक्ष माननीय भिमरावजी धोंडे साहेब यांनी 2016 साली आष्टी मध्ये केली. नुकतीच या कॉलेजच्या  विद्यार्थ्यांची पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच फार्मसिस्ट म्हणून महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल मुंबई या ठिकाणी नोंदणी झालेली आहे या कॉलेजची ही एक अभिमानास्प गोष्ट आहे.

2016 ते 2020 चार वर्षानंतर पहिली बॅच उत्तीर्ण झाल्या झाल्या लगेच विद्यार्थ्यांची फार्मासिस्ट म्हणून नोंदणी होणे ही एक आनंदाची गोष्ट आहे. कोणतेही फार्मसी कॉलेज चालू झाल्यानंतर त्या कॉलेजमधून पहिली बॅच उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच त्याचे फार्मसिस्ट (नोंदणीकृत औषध निर्माता)म्हणून नोंदणी होणे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते फार्मासिस्ट नोंदणी झाल्यानंतर त्याला त्या नोंदणीकृत सर्टिफिकेट च्या आधारे स्वतःचे औषधाचे दुकान (मेडिकल स्टोअर), औषधाचे डिस्ट्रीब्यूशन स्टोअर चालू करता येते. तसेच हॉस्पिटल ,सरकारी दवाखान्यांमध्ये ,मेडिकल शॉप मध्ये फार्मसिस्ट म्हणून जॉब करता येतात मिळतात.


त्यामुळे सर्वात महत्वाची अशी गोष्ट फार्मासिस्ट लायसन ही फार्मसी क्षेत्रांमध्ये खूप महत्त्वाची बाब आहे.संस्थापक अध्यक्ष माननीय भिमरावजी धोंडे साहेब , संचालक व सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व यश प्राप्त झालेले आहे असे या कॉलेजचे प्राचार्य सुनील कोल्हे यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांची फार्मासिस्ट म्हणून महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल, मुंबई याठिकाणी नोंदणी झाल्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भिमरावजी धोंडे साहेब संचालक अजय (दादा) धोंडे, सर्व प्रशासकीय अधिकारी डॉ. डी बी राऊत सर , शिवदास विधाते सर , दत्तात्रय गिलचे  सर ,माऊली बोडके सर , प्रा.शिवाजी वनवे सर, संजय शेंडे सर यांनी विद्यार्थी प्राचार्य ,सर्व प्राध्यापक , इतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
No comments