Breaking News

ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या- संभाजी राजे

नाशिक : मराठा समाजानं पहिल्या दिवसापासूनच सामाजिक मागास सिद्ध केला आहे, असं म्हणत मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजी राजे छत्रपती य़ांनी पुन्हा त्यांची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. पण, EWS आरक्षण घेतल्याने समाजाला धोका होणार नाही हे सरकारने सांगावं, असं म्हणत त्यांनी आग्रही भूमिका मांडली.

EWS घेतल्याने SEBS ला धोका निर्माण होईल. किंबहुना EWS आरक्षण सर्व खुल्या वर्गासाठी आहे ते फक्त मराठा समाजासाठी नाही, असं म्हणत त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत न्यायालयाकडून चांगला निर्णय अपेक्षित असल्याचं म्हटलं. शिवाय, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या obc समाजात भीती निर्माण झाली आहे हे खरं. मात्र, obc ला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करताना ते दिसले. यावेळी पंतप्रधानांच्या भेटीसाठीही त्यांना आशा व्यक्त केल्या. पण, पंतप्रधान यांच्या भेटीची मी आज देखील वाट पाहतोय, अजून वेळ मिळाला नाही असं म्हणताना त्यांनी निराशेचाही सूर आळवला. शिवाय दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर प्रकाशझोत टाकत शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने मार्गी काढावेत अशीही मागणी केली.

No comments