Breaking News

आष्टीच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश

आष्टी : श्री छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय,आष्टी येथील आठ विद्यार्थ्यांनी या वर्षी विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच  विदेशामध्ये प्रवेश मिळवत देदीप्यमान  यश संपादित केले आहे. 

पडोवा विद्यापीठ, इटली यांच्या द्वारे घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम. एस. सी. एग्रीकल्चर) प्रवेश परीक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थी मेका साई नागार्जुन रेड्डी याने घवघवीत यश मिळवून प्रवेश मिळवला. तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे द्वारे घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम. एस. सी. एग्रीकल्चर) प्रवेश परीक्षेत  तब्बल सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळून राज्यातील वेगवेगळ्या शासकीय कृषी महाविद्यालय मध्ये प्रवेश मिळवला आहे.  

यामध्ये कु. देशमाने आशा, कु. आरती पाटील, कु. हीना शेख कु. मोहिनी शेवाळे, ससाणे सचिन, निलेश माने, बिरादार विशाल  इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष मा.भिमरावजी धोंडे , संचालक श्री. अजय (दादा ) धोंडे, कॉलेजचे प्राचार्य  श्री. श्रीराम आरसुळ, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डि . बी. राऊत, प्रा. शिवाजी विधाते , श्री. दत्‍तात्रय गिलचे, संजय शेंडे महाविद्यालयातील शैक्षणिक  विभाग प्रमुख प्रा. गोकुळ नवसरे, विद्यार्थी समुपदेशन कक्ष प्रमुख प्रा. पोपट काळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. इर्शाद तांबोळी, नोडल ऑफिसर प्रवीण जाधव, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. महेश साबळे, विध्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. सागर देसाईपाटील व इतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.






No comments