Breaking News

मराठवाड्यातील पहिल्या फिरत्या एटीएमचे आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते उद्घाटन


दि मराठवाडा आर्बनने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला- आ.प्रकाश सोळंके

माजलगाव :  शहरातील दि मराठवाडा आर्बनने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरासह तालुक्यातील सभासद,खातेदार व ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याचे गौरवदगार दि मराठवाडा आर्बनच्या मराठवाड्यातील पहिल्या फिरत्या ए.टी.एम.च्या उदघाटन प्रसंगी बोलताना आ.प्रकाश सोळंके यांनी सांगितले.

दि मराठवाडा आर्बनच्या वतिने दि ०३ जाने रविवार रोजी सकाळी १०:३० वाजता मराठवाड्यातील पहिल्या फिरत्या ए.टी.एम.चे उदघाटन आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी नगराध्यक्ष शेख मंजुर,तुळजाभवानी आर्बनचे संस्थापक आध्यक्ष चंद्रकांत शेजुळ,बाजार.समितीचे सभापती संभाजी शेजुळ,अँड भानुदास डक,भागावताचार्य ह.भप.अंकिता दिदी माने,ह.भ.प.शिवाजी महाराज गडदे,मा.नगरध्याक्ष नासेर खाँ.पठाण,नगरसेवक सुशांत पौळ,नगरसेवक सय्यद राज अहमद,कचरु तात्या खळगे,अँड नारायण गोले यांची प्रमुख उपस्थिती होती,यावेळी उद्घाटन प्रंसगी बोलतांना आ.सोळंके म्हणाले की,माजलगाव मध्ये अनेक छोट्या मोठ्या सहकारी पतसंस्था आहेत,  त्यामध्ये दि मराठवाडा आर्बनने ग्राहक आपल्या दारात नाही तर आपण ग्राहकांच्या दारात जाऊन फिरत्या ए.टी.एम.च्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन माजलगाव तालुक्यातील खातेदार, सभासद व ग्राहकांचा अल्प कालावधीत विश्वास संपादन केला असल्याचे प्रतिपादन आ.सोळंके यांनी बोलताना व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक दि मराठवाडा आर्बनचे संस्थापक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले ,व सुत्रसंचालन आशोक वाडेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन माजलगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेनचे सचिव संजय सपाटे यांनी मानले. कार्याक्रम यशस्वी करण्यासाठी दि मराठवाडा आर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन डासाळकर,आमोल आंधारे,सौ सिमा टाक,सौ.सुरेखा बाभुळगावकर,शरद शेजुळ, सचिन दळवी विनायक तौर व नागेश थावरे यांनी परिश्रम घेतले.


No comments