Breaking News

ढोरगावात खा.डॉ.प्रतिम मुंडे यांच्या हास्ते विविध विकास कामाचे भुमिजन

माजलगाव :  तालुक्यातील ढोरगाव येथे भाजपाच्या प्रदेश उपध्याक्ष तथा बीड जिल्ह्याच्या खा.डाँ प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते विविध विकासकामाचे भुमिपुजनाचा कार्यक्रम दि २७ जाने बुधवार रोजी संपन्न झाला.

माजलगाव तालुक्यातील ढोरगावचे सरपंच कुष्णा सरवदे यांनी ग्रामपंचायत इमारतीसाठी प्रशासनाकडुन निधी खेचुन आणुन ढोरगाव ग्रामपंचायतच्या इमारत बांधकामाचे व हानुमान मंदीर परीसरातील कंपाऊंड बांधकामाचे भुमीपुजन भाजपाच्या प्रदेश उपध्याक्षा तथा बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डॉ. प्रतिमताई मुंडे यांच्या हस्ते दि २७ जाने बुधवार रोजी सांयकाळी ७:०० वाजता संपन्न झाले, यावेळी भाजपाचे नेते रमेश आडसकर,माजी नगराध्यक्ष डॉ आशोक तिडके, बबनराव सोळंके,इश्वर खुर्पा, धनगर समाजाचे जेष्ट नेते बबनराव सरवदे,भाजपाचे तालुका उपध्याक्ष ज्ञानेश्वर सरवदे व ढोरगाव येथील उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती.


No comments