Breaking News

पंकजा मुंडे यांच्या अंगरक्षकाचा मोटार सायकल अपघात अपघातात एक महिला ठार

दिंद्रुड : माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा अंगरक्षक गणेश खाडे यांचा मोटरसायकल अपघात झाल्याने  जखमी झाल्याची घटना बीड परळी महामार्गावर नाथ्रा पाटी नजदीक आज सकाळी दहा वाजता घडली. या अपघातात गणेश खाडे यांची आई सुलोचना बलभीम खाडे यांचे निधन झाले असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

अधिक वृत्त असे की, गणेश खाडे व आई सुलोचना बलभीम खाडे या माहेरी कौडगाव हुन स्वगावी कांदेवाडी कडे परतत असताना परळी बीड हायवे वरील नाथ्रा पाटीजवळ मोटारसायकल स्लीप झाल्याने अपघात घडला होता या अपघातात सुलोचना खाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे जागिच मृत्यू झाला, परळी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असता मृत्यु झाल्याचे घोषित करण्यात आले.या अपघातात गणेश बलभीम खाडे किरकोळ जखमी झाले आहेत.

No comments