Breaking News

युवा उद्योजक संघाने घेतली आ.सुरेश आण्णा धस यांची भेट..!

आष्टी :  येथे आ.सुरेश आण्णा धस यांची मा.नगराध्यक्ष दिलीप आण्णा गोरे यांनी युवा उद्योजक संघाचे अध्यक्ष दत्ता जाधव, सचिव धनंजय गुंदेकर, खजिनदार धर्मराज फाळके, युवा उद्योजक सचिन टकले, युवा उद्योजक संदीप झांबरे आदींची भेट घालून दिली. पाळीव प्राण्याचा विमा सुरू करावा,यासाठी आपण विधानपरिषदेत प्रश्न मांडावा अशी मागणी केली.

तसेच बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखाने वेळेवर सुरू व्हावेत,यासाठी बीड येथे सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या बैठक घ्यावी अशी विनंती केली.तसेच युवा उद्योजकांच्या प्रश्नावर आपण आम्हाला मदत करावी,अशी मागणी देखील युवा उद्योजक संघांनी केली.
No comments