Breaking News

मांजरा प्रकल्प कालव्यातून रब्बी हंगामातील पाणी सोडले : शेतकऱ्यांत समाधान

अंबाजोगाई :  मांजरा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून गुरुवारी (दि.21) रब्बी हंगामासाठी शेतीसाठी पाणी सोडण्यात आले.यासाठी केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांंनी सतत पाठपुरावा केला तसेच पाठबंधारे मंत्री यांनाही पाठपुरावा केला होता.यामुळे आज पाणी हे शेतकऱ्यांना सोडले गेले आमदारांच्या पाठपुराव्यामुळे सर्वत्र शेतकरी बांधवांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.


गुरुवारी सकाळी 9 वाजता मांजरा डावा कालव्यातून गेट क्रमांक 1मधून3.087 प्रतिसेकंद घनमीटर या विसर्गाने तर मांजरा उजवा कालव्यातून गेट क्रमांक 2 मधून 4.127 प्रतिसेकंद घनमीटर या विसर्गाने सायंकाळी साडेसहा वाजता रब्बी हंगामा साठी कार्यकारी अभियंता ,मांजरा प्रकल्प 1, लघू पाटबंधारे विभाग लातुर यांच्या परवानगी नुसार सोडण्यात आल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता शाहू पाटील यांनी दिली .या बाबत केज विधान सभेच्या आमदार सौ .नमिता मुंदडा यांनी कालव्यातून पाणी सोडण्याची विनंती पाटबंधारे मंत्री यांना केली होती.


No comments