Breaking News

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सावित्रीच्या लेकींचा सन्मान सोहळा साजरा


बीड :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज जि बीड या संस्थेचा नाविन्यपूर्ण उपक्रम  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जोला येथे लाडक्या लेकींचा सन्मान महोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.लाडक्या लेकींचा सन्मान महोत्सव उपक्रमामुळे कार्यक्रम स्थळी आनंदी आनंद झाला. 

गावातील महिला व बालकांना खुपचं सुखद अनुभव आला असं तेथील एका महिलेने भावना व्यक्त करताना म्हटले गावात महिलांचा व मुलींचा सन्मान होत आहे म्हणजे खय्राअर्थाने सावित्रीच्या लेकींचा सन्मान करण्यात येतोय असाच अनुभव येत आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आरोग्य सेविका आश्राबाई केदार मॅडम , आरोग्य सेवक रामचंद्र आंधळे ,लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक श्री बाजीराव ढाकणे तसेच क्रार्यक्रमाचे आयोजन श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला च्या आशाताई ढाकणे यांनी केले होते. सुनिता केदार, सविता सारूक, पल्लवी सारुक, रेणुका ढाकणे, आशा ढाकणे, बाळुबाई ढाकणे,मिरा ढाकणे , अनिता ढाकणे, मोहर हांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आशाताई ढाकणे, रामचंद्र आंधळे  बाजीराव ढाकणे व महिलांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थिती महिलांच्या अतिशय बोलक्या प्रतिक्रिया मिळाल्या महिलांच्या डोळ्यात पाणी आले होते. रामचंद्र आंधळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सार्थक झाली असे म्हणता येईल कारण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गावातील महिला व मुलींचा सन्मान महोत्सव साजरा झाला असे हि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.या आनंदात सहभागी झाल्याबद्दल उपस्थित पाहुण्यांचे आभार आशाताई ढाकणे यांनी मानले.

No comments