Breaking News

कन्यारत्नाला जन्म देणाऱ्या मातेंचा अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी साडीचोळी देवून केला सन्मान

शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी महिला जिल्हाप्रमुखाचा आदर्श उपक्रम

बीड : स्त्री-पुरूष समानतेच्या नव्या युग आणि समाजाची बदललेली मानसिकतेमुळे आज मुलींच्या जन्माचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत होऊ लागले आहे. यालाच पाठबल म्हणून हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीदिनी जिल्हा रुग्णालयात मुलींना जन्मदेणार्‍या मातेंचा शिवसेना महिला जिल्हा प्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांच्याकडून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांच्याहस्ते साडीचोळी देवून सन्मान करण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, महिला संपर्क संघटक गडकरीताई, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हाध्यक्षा संगिताताई चव्हाण यांच्या संकल्पनेतून शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी म्हणजेच दि.23 जानेवारी रोजी बीड शहरासह जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेत महिला आघाडीच्या वतीने भगवा सप्ताहा साजरा करण्यात आला. यामध्ये महिलांची नोंदणी, शाखा स्थापना, ऊसतोड मजूरांना ब्लँकेटचे वाटप, पारधी समाजातील कुटूंबियांना धान्य वाटप तसेच अनाथांना मदतीचा हात देण्याचे काम यावर्षी भगवा सप्ताहामध्ये उपक्रम राबविण्यात आले. 

यामध्ये शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीदिनी म्हणजे शनिवार दि 23 जानेवा री 2021रोजी जिल्हा रुग्णालयात मुलींना जन्म देणार्‍या मातेंचा जिल्हा प्रमुख यांच्याकडून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या यांच्या हस्ते साडीचोळी देवून सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण, उपजिल्हा प्रमुख फरजाना शेख, शांता राऊत, रेखा वडमारे, संगिता वाघमारे, ललिता आडाणे, लक्ष्मी गुरूकुल सविता शेटे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारीका, परिचारीका, कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments