Breaking News

संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने साजरी


परळी :  वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनिमंदिरात संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने शासकीय नियमांच्या अधिन राहून साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील समाजबांधव उपस्थित होते.

                येथील श्री. शनिमंदिरात तेली समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी पारंपरिक पध्दतीने कोविड विषयक शासकीय नियमांचे पालन करुन साजरी करण्यात आली. सदुंबरे जिल्हा पुणे येथील श्री संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी होते. तसेच तुकाराम महाराजांची मुळ गाथा पाण्यात टाकण्यात आली होती. 

ती संपूर्ण गाथा श्री.जगनाडे महाराजांना मुखोद्गत असल्याने त्यांनी ही गाथा पुन्हा लिहून काढली. त्यामुळे श्री.संताजी जगनाडे महाराजांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सोमवारी (ता.११) संताजी महाराजांची पुण्यतिथी होती. ती येथील समाजबांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी समाजातील शंकरराव सोनटक्के यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. शंकरराव सोनटक्के यांचा शनि मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाप्पा लांडगे, विश्वस्त राजेभाऊ शिदे, व्यवस्थापक चंद्रकांत उदगीरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुढच्या वर्षीचे अन्नदाते घोषित करण्यात आले.

No comments