Breaking News

महिलांचे जीवनमान उंचविण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले - प्रकाशराव कानगांवकर


ओबीसी, बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार, भटक्या विमुक्त,

एसबीसी संघटनेच्यावतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

बीड :  दीडशे वर्षापूर्वी स्त्री-पुरुष समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभारुन तत्कालीन समाज व्यवस्थेशी कडवी झुंज देवून बालविवाहाला विरोध करणार्‍या सावित्रीमाई फुले यांनी महिलांना साक्षारतेचे धडे देवून महिलांसाठी शिक्षणाची दारे खुले करुन दिली. महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते कधीही विसरता येणार नाही. असे प्रतिपादन ओबीसी, बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव कानगावकर यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची आज दि. 3 जानेवारी रोजी जयंती निमित्त ओबीसी, बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार संघटनेच्यावतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

बीड शहरातील सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स येथील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास ओबीसी, बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार संघटनेच्यावतीने अभिवादन केल्यानंतर आपले विचार व्यक्त करतांना प्रकाशराव कानगावकर यांनी फुले दाम्पत्यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की,  शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातलं स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलंबी बणून त्यांच्या पायावर उभे रहावे यासाठी प्रयत्न केले. असेही प्रकाशराव कानगावकर म्हणाले.

 या अभिवादन सभेला माळी समाज महासंघाचे नेते  प्रा. लक्ष्मणराव गुंजाळ,  दादासाहेब मुंडे, धनगर समाज कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अंकुश निर्मळ  साळी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजु ताठे, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष गुलाबभाऊ चव्हाण, रमेश राऊत, कैकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश कैवाडे, परीट समाजाचे नेते रमेश घोडके, भाई दत्ता प्रभाळे, सोनाजी किवणे, लोहार समाजाचे आनेराव, कोष्टी समाजाचे सुरेश असलेकर, गोसावी समाजाचे अ‍ॅ राजेंद्र बन किरण वाघमारे, बापू भालेकर, उमेश स्वामी, संजय घेणे, दत्ता गुणवंत  यांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments