Breaking News

लोणीत परिसरात पाच मोरांच्या मृत्युने खळबळ


शिरूर कासार :  राज्यातील बहुतांश भागात बर्ड फ्ल्यू मुळे कावळे, कोंबड्या, कबुतर या पक्षांचा मृत्यू झाल्याचे समोर येत असताना शिरूर तालुक्यातील लोणी शिवारात शुक्रवारी (दि.२२) पाच मोरांच्या मृत्युने खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी (दि.२२) सकाळी १० च्या सुमारास  माळसोंडाच्या पायथ्याशी येताळा दादाबा महानोर व अंबादास दत्तोबा केदार यांच्या शेतामध्ये तीन मोर व दोन लांडोर मृत पावल्याचे आढळून आले.यावेळी त्या ठिकाणी एक मोर जिवंत होता.मात्र थोड्याच वेळात त्याने ही प्राण सोडल्याचे प्रत्यक्षदर्शी भास्कर बडे यांनी सांगितले.दरम्यान या घटनेची माहिती पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्यानंतर घटनास्थळी शिरूरचे पशुसंवर्धन अधिकारी श्री.आघाव,वन अधिकारी कार्यालयातून सायमा पठाण,प्राणी मित्र सिद्धार्थ सोनवणे,श्री.परजणे आदींनी भेट दिली.मृतांचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे काम सध्या सुरु असून ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे श्री.आघाव यांनी सांगितले.No comments