Breaking News

कार- मोटरसायकची धडक : दुचाकी जळून खाक तर मोटरसायकलस्वाराचा मृत्यू


केज -  मसाजोग रस्त्यावर भीषण अपघात

 गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील मसाजोग येथे केज-बीड रोड एक मोटरसायकल व मारुती कार (एम एच-२३ वाय-०१२१) यांची समोरा समोर धडक होऊन मोटारसायकलने जागीच... पेट घेतला मोटरसायकलस्वाचा मृत्यू झाला आहे. 


या बाबतची माहिती अशी की, दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी ६:०० वा. च्या दरम्यान केज-बीड रोड वरील पासून सुमारे दीड किमी अंतरावर वरील पेट्रोल पंपाजवळ मोटर सायकल व मारुती कार (एम एच-२३ वाय-०१२१) यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, मोटरसायकल आणि मारुती गाडी यांची धडक होताच मोटरसायकलने पेट घेतला. या अपघातात मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे.

No comments