Breaking News

आ.सुरेश धस यांच्याकडून बिबटयाच्या हल्ल्यात मयत नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबाला ५ लक्ष रुपयांचा धनादेश केला सुपूर्द

आष्टी :  तालुक्यातील सुरुडी परिसरातील शेतामध्ये काम करत असताना आष्टी पंचायत समितीचे सदस्यपती नागनाथ गहिनीनाथ गर्जे हे बिबट्याच्या हल्लात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.त्यांच्या दशक्रिया विधी दिवशी मदतीचा शब्द आ. सुरेश धस यांनी दिला होता. बोलल्याप्रमाणे रविवार दि १७ जानेवारी रोजी गर्जे कुटुंबांला ५ लक्ष रुपयांची वैयक्तीक मदत आ.सुरेश धस यांनी  स्व.नागनाथ गर्जे यांची पत्नी आशाताई गर्जे व वडील गहिनीनाथ गर्जे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.

     बिबट्याच्या हल्लात नागनाथ गर्जे यांचा शेतात काम करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला होता.त्यांच्या कुटुंब व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आ.सुरेश धस यांनी वैयक्तिक ५ लक्ष रुपये त्यांच्या दशक्रिया विधी च्या कार्यक्रमात बोलताना जाहीर केले होते.दिलेला शब्द पाळत आ.सुरेश धस यांनी ५ लक्ष रुपयांचा धनादेश त्यांची पत्नी आशाताई गर्जे यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सभापती बद्रीनाथ जगताप, उपसभापती रमेश तांदळे, रंगनाथ धोंडे, यशवंत खंडागळे, रावसाहेब लोखंडे, अशोक मुळे, भारत मुरकुटे, जिया बेग, गणेश शिंदे, विनोद रोडे, प्रविण वारे, नवनाथ लोंढे आदी उपस्थित होते.


No comments