Breaking News

अ. भा. वी. लिंगायत महासंघाचा ९ व्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी


कोल्हापुरात  ६  फेब्रुवारी रोजी वीरशैव समाज हजारोंच्या संख्येत होणार दाखल

कोल्हापूर : अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या नववा वर्धापनदिन कोल्हापूर येथे दि.६  फेब्रुवारी २०२१ रोजी मोठ्या दिमाखात साजरा होणार असून राज्यासह देशभरातील वीरशैव समाज बांधव हजारोंच्या संख्येत दाखल होणार असल्याची माहिती अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ जिल्हाध्यक्ष संतोष जंगम यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. अक्कमहादेवी मंडप,बिंदु चौक कोल्हापूर येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजता होत असलेल्या महासंघाच्या वर्धापनदिन सोहळ्याला महाराष्ट्र राज्यासह राजस्थान, कर्नाटक, गुजराथ, हरियाना, दिल्ली आदी भागातून समाज बांधव उपस्थित राहणार आसल्याची माहिती संतोष जंगम यांनी दिली आहे. 

 कोल्हापूर येथे होत असलेल्या महासंघाच्या नवव्या वर्धापनदिनाचे यजमानपद अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा शाखेने स्वीकारले असून प.पू.डॉ.निळकंठ शिवाचार्य धारेश्वरकर,  प.पू.डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य मन्मथधामकर, प.पू.श्रीगुरू महादेव शिवाचार्य वाईकर, वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य वसमतकर, प.पू. डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य मुखेडकर, नूल मठाचे मठाधिपती प.पू. गुरूसिध्देश्वर शिवाचार्य यांचे प्रमुख मार्गदर्शन या सोहळयात लाभणार आहे. या कार्यक्रमास म्हाडा चे मराठवाडा सभापती(राज्यमंत्रीदर्जा) संजयजी केणेकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्रीदर्जा) अशोक स्वामी,दिलीप स्वामी मुख्यकार्यकारी अधिकारी,सोलापुर,सुधिर हिरेमठ पोलिस उपआयुक्त पिंपरी चिंचवड,सिध्दाराम सालीमठ मुख्यकार्यकारी अधिकारी,पालघर, इचलकरंजीच्या नक्षराध्यक्षा अॅड.सौ.अलका  स्वामी, कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेविका उमा बनछोडे, वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, वीरशैव बँकेचे संचालक चंद्रकांत जंगम, न्यायाधिश. सोनाली स्वामी, महासंघाचे बांग्लादेश संघठक श्री. पंकज रॉय, यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

२०२१ मध्ये होणार्‍या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर महासंघाच्या या वर्धापनदिनाकडे औत्सूक्याने पाहिले जात आहे. या बाबत महासंघाची भूमिका काय असेल याकरिता समस्त वीरशैव समाजाचे लक्ष आहे. 

वर्धापनदिनाच्या अनुषंगाने वीरशैव समाजात आपल्या कार्याची विशेष छाप सोडणार्‍या पुणे येथील शरद गंजीवाले,कायदेतज्ञ महेश स्वामी,बाळ देऊळकर, कोल्हापूर वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनिल गाताडे, हिन्दू आणि वीरशैव एकच या पुस्तिकेचे लेखक सोलापूर येथील सिध्दाराम पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तर प्रशासकीय तथा सामाजीक क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या रामदास पाटील यांना धर्मरक्षकवीर, स्पर्धा परीक्षेसाठी सातत्याने विद्यार्थ्याना मार्गदर्शन करीत हजारो प्रशासकीय अधिकारी या देशाला देणारे आदरणीय मनोहर भोळे यांना विशेष कार्यगौरव, कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुनिल गाताडे यांना समाजभूषण, सामाजिक कार्यकर्ते किशोर बाळासाहेब पाटील यांना समाजभूषण, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कामिगरीसाठी पत्रकार परमेश्वर लांडगे यांना निर्भिड पत्रकार आणि साहित्यरत्न, वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रूग्णालयाचे डॉ. महेश रेवाडकर व डॉ.जयश्री तोडकर पुणे यांना वैद्यकिय सेवारत्न,  सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान असलेल्या बीड येथील पत्रकार संतोष स्वामी यांना विशेष कार्यगौरव, सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या कोल्हापूर येथील वीरशैव अर्बन मल्टीपर्पज निधि बँकेचे चेअरमन संतोष जंगम यांना सहकाररत्न, कोल्हापूर येथील पत्रकार बाळकृष्ण सांगवडेकर यांना उत्कृष्ट साहित्यिक,अॅड महेश स्वामी यांना कायदेरत्न व सागर माळी यांना कार्यगौर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही यावेळी बोलतांना डॉ.स्वामी यांनी सांगीतले.

 

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे अध्यक्ष भिवलिंग जंगम, महासचिव अजित स्वामी, कोषाध्यक्ष प्रकाश जंगम, सचिव वैजनाथ स्वामी, महिला आघाडी प्रमुख विद्याताई जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुर जिल्हाध्यक्ष संतोष जंगम,महिला जिल्हाध्यक्षा सौ.स्नेहल मठपती व समस्त पदाधिकारी यांचे वतीने सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील अधिकाधिक समाज बांधवांनी महासंघाच्या या वर्धापनदिन सोहळ्याला उपस्थित राहून वीरशैव समाजासाठी ऐतिहासिक ठरणार्‍या या क्षणांचे साक्षीदार व्हावे असे आवाहन महासंघाच्या राज्यभरातील शाखांकडून करण्यात आले आहे.


No comments