Breaking News

एकही शाळा इमारती पासून वंचित राहणार नाही : बजरंग सोनवणे


हारगडवाडी येथील शाळेच्या इमारतीचे बजरंग सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन

गौतम बचुटे । केज 

बीड जिल्ह्यातील एकही शाळा किंवा वर्ग आता उघड्यावर भरणार नाही. सर्व शाळांना इमारती बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून ज्ञानदानाचे कार्य करावे. लवकरच शाळा सुरू होणार आहेत. असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्यातील हारगडवाडी येथे शाळेच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी केले.


No comments