Breaking News

राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४२३वी जयंती परळी पत्रकार भवन येथे साजरी

परळी :  राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४२३वी जयंती दि.१२ जानेवारी २०२१ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन परळी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प-हार अर्पण करून वंदन करण्यात आले. 

 परळी शहराचे न.प.चे उपनगराध्यक्ष शकील कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी नूतन शहराध्यक्ष प्रल्हाद कंडूकटले, तालुकाध्यक्ष बाबा शेख, कार्याध्यक्ष रानबा गायकवाड, सल्लागार प्रकाश सूर्यकर, वैजनाथ गायकवाड, फुले-आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे, जुनाळ सर, गोविंद कुकर आदींची उपस्थिती होती. यावेळी उपनगराध्यक्ष शकील कुरेशी म्हणाले की, राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी. उपस्थितांचे आभार प्रकाश सूर्यकर यांनी मानले.





No comments