Breaking News

ना. धनंजय मुंडेंच्या जिल्ह्याला मराठवाड्यात सर्वाधिक निधी

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी आजी-आजोबांचे सत्तर कोटी जमा

बीड : बीड जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचा निधी जिल्हाधिकारी कार्यलयाकडे जमा झालेला असून त्या संदर्भाचा शासन आदेश प्राप्त झालेला आहे. मराठवाड्यातील एकूण जिल्ह्यात सर्वाधिक निधी हा ना. धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्याला मिळाला असून यासाठी आजी आजोबांना  मोठा दिलासा देण्याचे काम पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केल्याची भावना लाभार्थी वर्गातून समोर येत आहे .

 


सन २०२० ते २०२१ मधील सर्वसाधारण लाभार्थी करिता संजय गांधी निराधार अनुदान योजना साठी २० कोटी ६८ लाख ९८ हजार ५३९ रु आणि श्रावण बाळ योजनेचे ४९ कोटी ८४ लाख ३४ हजार ११९ रु असे एकूण सुमारे ७० कोटीचा निधी शासनाकडून  बीड जिल्हाधिकारी कार्यलयाकडे जमा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीत मराठवाड्यात सर्वाधिक निधी बीड जिल्ह्यासाठी मिळवून घेतला  आहे .  वरील निधी हा ओक्टो २०२० ते मार्च २०२१ साठीचा असल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. शासन निर्णय सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग कडून शासन निर्णय क्रमांक विसयो २०२० / पक्र १२३ प्रमाणे २५ जानेवारी रोजी सदरील आदेश शासनाने काढला आहे.

मी सेवेसाठी कटीबद्ध - ना. धनंजय मुंडे

शासन पातळीवर सर्वोतपरी प्रयत्न करण्याची जबाबदारी माझी आहे . यश कितीही येवो मात्र पूर्ण वेळ आपला भाग आणि आपल्या माणसासाठी निधी आणण्याचे कर्तव्य निर्वहन मी करणार आहे , सदरील निधी हा वितरीत लवकर होईल यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत सर्व तालुक्यातील संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचा पाठपुरावा देखील महत्वाचा राहिलेला आहे . यापुढे देखील आजी आजोबांच्या मानधनासाठी आग्रही राहू असे पालकमंत्री ना . धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.


No comments