Breaking News

परळी पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

 दै.वैद्यनाथ वार्ताचे संपादक रामप्रसाद गरड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

परळी वै. : पत्रकार दिनानिमित्त नुकत्याच नियुक्त करण्यात आलेल्या परळी तालुका व शहर  पत्रकार संघाच्या पदाधिकारयांचा सत्कार अनंत इगळे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला. तसेच यावेळी दै.वैद्यनाथ वार्ताचे संपादक रामप्रसाद गरड याचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.

 यावेळी सत्कारमूर्ती शहराध्यक्ष-प्रल्हाद कंटूकटले,तालुका कार्याध्यक्ष रानबा गायकवाड, दै.गावकरीचे जगदीश शिंदे, ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम,दै.महाभारत चे विकास वाघमारे तसेच संपादक रामप्रसाद गरड इ.चा सत्कार करण्यात आला. अनंत इंगळे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास  नगरसेवक केशव गायकवाड, नगरसेवक महादू रोडे,प्रणव परळीकर,फेरोज खान, रवी मुळे,सचिन मराठे,धम्मा अवचार, शाम दासू,तोहिद शेख,जयेश बुक्तर,नाना वाघमारे, प्रशांत कांबळे ,लक्ष्मण वैराळ, लिंबाजी दहिफळे आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि.भगवान साकसमुद्रे यांनी तर आभार अनंत इंगळे यांनी मानले.

No comments