Breaking News

रायमोहा ग्रामपंचायतवर जालिंदर सानप, कान्होबाचीवाडीत संतोष सवासे, कोळवाडीत साईनाथ नेटके यांचे वर्चस्व!

 

ग्रामपंचायत निवडणुकीत रथी-महारथी पराभूत

भारत पानसंबळ । शिरूर कासार 

तालुक्यातील रायमोहा ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे संपर्कप्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सरपंच प्रा. मदन जाधव, जिल्हा बँकेचे संचालक वसंतराव सानप, शिवसेनेचे जिल्हा संघटक भारत जाधव ,माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे विश्वासू सुलेमान पठाण यांना या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला तर शिरूर पंचायत समितीचे उपसभापती यांच्या गटाचे सात उमेदवार विजयी झाले. विरोधी गटाचे केवळ चार उमेदवार विजयी होऊ शकले तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेली ही ग्रामपंचायत शिरूर पंचायत समितीचे उपसभापती जालिंदर सानप यांच्या गटाच्या ताब्यात निर्विवाद आली. 

शिरूर कासार तालुक्‍यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जात असलेल्या रायमोहा गावच्या ग्रामपंचायत वर गेल्या दहा वर्षांपासून प्रा. मदन जाधव यांचे वर्चस्व होते ,या निवडणुकीत स्वतः सहत्यांच्या गटाचा दारून पराभव झाला त्याबरोबर या निवडणुकीत जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक वसंत सानप शिवसेनेचे जिल्हा संघटक भारत जाधव माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे सुलेमान पठाण यांचा दारुण पराभव झाला तर शिरूर पंचायत समितीचे उपसभापती जालिंदर सानप यांच्या गटाचे सात उमेदवार विजयी झाल्याने ग्रामपंचायत वर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले प्रा. मदन जाधव यांचा पराभव उपसभापती जालिंदर सानप यांच्या गटाचे सुरेश उद्धवराव जाधव यांनी केला तर वसंत सानप यांचा पराभव काकासाहेब जाधव यांनी केला सुलेमान पठाण यांचा पराभव माजी उपसरपंच मुराद पठाण यांनी केला या निवडणुकीत रथी-महारथी यांना पराभवाची धूळ चाखावी लागली हे विशेष.

कान्होबाचीवाडीत संतोष सवासे गटाचे ५ तर माजी सरपंच बबन मोरे गटाचे दोन उमेदवार विजयी...

कोळवाडीत साईनाथ नेटके यांचे ५ पैकी चार  उमेदवार विजयी माजी सरपंच बाबासाहेब नेटके गटाकडे २ तर सुभाष यमपुरे गटाचा 1 उमेदवार विजयी झाला 

माध्यमांच्या नजरेआड मतमोजणी

तालुक्यातील आठ ग्रामपंचायत मतमोजणी निकाल सोमवार (दि .१८) रोजी तहसील कार्यालयात मोठ्या बंदोबस्तात पार पडला परंतु ही मतमोजणी प्रक्रिया पार पडत असताना निवडणूक विभागाने माध्यमांना नजरेआड बैठक व्यवस्था केल्याने माध्यमांना ऐकीव निकाल हाती मिळत होता त्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधी मध्ये मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली.

No comments