Breaking News

काँग्रेसच्या सय्यद सादेक यांनी आपचा झाडू घेतला हाती


बीड :  शहरात नावाला असलेल्या काँग्रेसला सय्यद सादेक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आम आदमी पार्टीचा झाडू हातात घेतला आहे. सादेक यांची आपच्या बीड शहराध्यक्ष पदी निवड झाली असून नियुक्तीपत्र आपचे अशोक येडे, जिल्हा सचिव रामधन जमाले यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.

काँग्रेस पक्षाचे सय्यद सादेक गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत असून सामान्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी कायम अग्रेसर असतात. मात्र त्यांची पक्षात घुसमट होत असल्याने अखेर सादेक यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करीत आम आदमी पार्टीत प्रवेश केला. आपचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विचार व ध्येय धोरण आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची व पार्टीची धडपड पाहून सय्यद सादेक यांनी आपचा झाडू हाती घेतला. वरिष्ठांनी त्यांच्यावर बीड शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. 

आपचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडेव जिल्हा सचिव रामधन जमाले यांनी सादेक यांना नियुक्तीतपत्र बहाल केले असून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.  पक्षाने सोपवलेली जवाबदारी व केजरीवाल यांचे  व पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम तत्पर राहील, असा शब्द सय्यद सादेक यांनी यावेळी दिला.

No comments