Breaking News

विविध जाती-धर्माला जोडणारी शिवसंग्राम संघटना


आमदार विनायक मेटे बहुजनांचे नेते  : शिवसंग्रमाचा 20 वा वर्धापन दिन बीडच्या मुख्य कार्यालयात उत्साहात साजरा 

बीड  : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची संकल्पना घेवून तसेच फुले-शाहु -आंबेडकर यांच्या विचारावर आधारीत आ. विनायक मेटे यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांना सोबत घेत शिवसंग्राम या सामाजिक संघटनेची स्थापना 6 जानेवारी 2001 मध्ये केली होती.  आज शिवसंग्रामचा विस्तार महाराष्ट्रभर झाला आहे. एका जातीची संघटना म्हणून शिवसंग्रामकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून विविध जाती-धर्माला जोडणारी संघटना म्हणून शिवसंग्राम सामाजिक संघटना पुढे आली आहे. शिवाय आ.विनायक मेटे हे बहुजनांचे नेते म्हणून त्यांचे नेतृत्व स्विकारले जातंय. असं मनोगत विविध मान्यवरांनी शिवसंग्रामच्या 20 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा कार्यक्रम न करता शिवसंग्रामचा 20 वा वर्धापन दिन बीड शहरातील शिवसंग्राम भवनमधील मुख्य कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.6) उत्साहात पार पडला. यावेळी शिवसंग्रामचे जेष्ठ नेते प्रभाकरअप्पा कोलंगडे, सुधीर काकडे, लक्ष्मण ढवळे, अनिल घुमरे, सुहास पाटील, रामहरी मेटे, नवनाथ प्रभाळे, ज्ञानेश्वर कोकाटे, मीराताई डावकर, राजेंद्र आमटे, अ‍ॅड. राहुल मस्के, सुनील शिंदे, बबनराव माने,    नितीन आगवान, गणेश धोंडरे, गणेश मोरे, शेषेराव तांबे, कैलास शेजाळ, जाकिर हुसेन, अझर आली, खुतूबभाई, अक्षय माने, प्रशांत डोरले, सुनील धायजे, शैलेश सुरवसे, राहुल गायकवाड, नामदेव धांडे, बजगुडेमामा,प्रा. पंडित शेंंडगे यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. महाराष्ट्रात प्रतिदिन नवनवीन संघटना-पक्ष निर्माण होतात व त्या अल्पजीव ठरल्याच्या अनेक उदाहरणे आहेत. समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी व त्यांचे हक्क अधिकार मिळावेत. यासाठी आ.विनायक मेटे यांनी फुले-शाहु-आंबेडकर यांचा आर्दश घेवून मोजक्याच कार्यकर्त्यांना सोबत घेवून शिवसंग्राम या सामाजिक संघटनेची स्थापना केली. आज संघटनेचा विस्तार राज्यभर झाला असून दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी त्यावेळी भाकित केले होते की, महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसंग्रामला सोबत घेतल्या शिवाय राजकारण करता येणार नाही. हे त्यांचे भाकित आज खरे ठरले आहे. एका जातीची संघटना म्हणून शिवसंग्राम बद्दल चर्चा केली जायची, मात्र शिवसंग्राम सर्व जाती-धर्माची संघटना म्हणून राज्यात पुढे आली आहे. त्यामुळेच शिवसंग्रामला सामजिक आणि राजकिय मान्यता समाज मनात प्राप्त झाली असून आमदार विनायक मेटे बहुजनांचं नेतृत्व म्हणून समाजाने त्यांना स्विकारले असल्याचे मत यावेळी पदाकिधार्‍यांनी व्यक्त केलं.

बीड पालिकेवर शिवसंग्रामचा झेंडा फडकविण्याचा संकल्प !
पक्ष संघटन वाढीसाठी आमदार विनायक मेटे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवून सामान्यांना संघटनेशी जोडण्याचे कार्य अविरतपणे कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. तसेच आगामी काळात होणार्‍या पालिका निवडणुकीत बीड नगर पालिकेवर शिवसंग्रामचा झेंडा फडकाविण्याचा संकल्प   वर्धापनदिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी केला. 
No comments