Breaking News

भाजीपाला आडत व्यवहार मालकीच्या जागेमध्ये करणार चालु -सभापती गोविंद फड


शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्याचे बाजार समितीला पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिले होते आदेश

परळी :  तालुक्यातील शेतकर्‍यांची भाजीपाला शेतमालावर आणि अनाधिकृत व्यापार्‍याकडून 10 टक्के आडत घेवून मोठ्या प्रमाणात लुट होत होती. या बाबत बाजार समितीकडे कांही तक्रार प्राप्त झाल्या होत्या. परंतु शासनाने 5 जुलेै 2016 रोजीचे राजपत्र प्रसिध्दीनुसार मार्केट यार्डच्या बाहेर भाजीपाल्यावरचे बाजार समितीचे नियमन उठविल्यामुळे या बाबत बाजार समितीस या बाबत कार्यवाही करता आली नाही. ही होणारी लुट बंद व्हावी यासाठी संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने या विषयी बाजार समितीस निवेदन देऊन आंदोलन करणेबाबत कळविले होते.

बाजार समितीचे उदिष्ट हे शेतकर्‍यांचे हित जोपासणे हे असुन कै.पंडीतअण्णा मुंडे यांनी आपण पुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी वेचले आहे. याच मार्गाने ना.धनंजय मुंडे साहेब वाटचाल करीत असून त्यांनी वेळोवेळी शेतकरी यांच्यासाठी निर्णय घेवून याची प्रचिती दिली आहे. शेतकर्‍यांनी होणारी लुट थांबविण्यासाठी बाजार समितीने करावे जे शक्य आहे ते बाजार समितीने करावे व आपले मालकीचे जागेमध्ये हा व्यवहार सुरू करून ही लुट थांबवावी असे आदेश ना.धनंजय मुंडे साहेब यांनी दिले असून या बाबत त्वरीत कार्यवाही करावी अशी सुचना नगर परिषद गटनेते वाल्मीक अण्णा कराड यांनी दिली असून या बाबत आवश्यक ती मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली आहे. 

बाजार समितीच्या मालकीच्या मौजे ब्रम्हवाडी येथे 80 एक्कर जमीन असून येथे स्व.मालकीचे गोडावून, सेल हॉल, सिमेंट रोड, लाईट व्यवस्था, पाणी व्यवस्था बाजार समितीने केलेली आहे. या ठिकाणी बाजार समिती भाजीपाला आडत व्यवहार चालु करण्यास तयार असून कार्यकारी मंडळाचे दि.23 जानेवारी 2021 रोजीच्या मिटींगमध्ये या बाबत ना.धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार निर्णय घेवून त्वरीत हा व्यवहार बाजार समितीचे स्वमालकीच्या जागेमध्ये चालु करण्याची कार्यवाही करणार असल्याची सभापती अ‍ॅड. गोविंद फड यांनी सांगीतले व यासाठी आवश्यक ती अनुमती लाईसन्स बाजार समिती देण्यास तयार आहे. तरी हा व्यवहार करण्यात तयार असणार्‍या व्यक्ती यांनी बाजार समितीकडे संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.


No comments