Breaking News

इमामपूर रस्त्यासाठी आंदोलनाल्या बसलेल्या लोकांना कमी समजू नका ; नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनी निवडणुकीत मत मागायला येऊ नये - अशोक ढोले


बीड :  शहरातील इमामपूर रोड - बार्शी नाका येथील रस्त्याचे काम गेल्या १ वर्षांपासून रखडलेले आहे. रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी वारंवार निवेदने, चर्चा करूनही नगरपरिषद प्रशासन दखल घेत नसल्यामुळे आम आदमी पक्षाने चार दिवसांपासून येथे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. दिवस रात्र ठिय्या मांडत आज देखील या आंदोलनाला येथील नागरिकांनी पाठिंबा देत नगर परिषदेच्या नकारात्मक धोरणाचा निषेध केला आहे. जनतेची काळजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष यांना नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक दादा ढोले पाटील यांनी म्हंटले आहे.

  इमामपूर रस्त्याचे काम रखडल्याने या भागात राहत असलेल्या हजारो लोकांना घाणीचा, अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे, या भागातील वाहतूक खोळंबली असून सर्व जनता प्रचंड त्रस्त झालेली आहे. या आंदोलनात महिला, तरुण, जेष्ठ मोठ्या संख्येने सहभागी झालेले असून जोपर्यंत रस्ताकाम सुरु होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आपने घेतली आहे. 

  मात्र ज्यांना मत देऊन निवडून दिले आहे ते नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष हे या भागातील जनतेकडे दुर्लक्ष करत असून या भागातील जनता त्यांना कदापी माफ करणार नाही. त्यांनी यापुढे या भागात मत मागायला पण येऊ नये असे सामाजिक कार्यकर्ते अशोक दादा ढोले पाटील यांनी म्हंटले आहे.No comments