Breaking News

माजलगाव पत्रकार संघाचे दर्पण, कोविड योद्धा पुरस्कार जाहीर


आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार वितरण सोहळा 

पत्रकार तुकाराम येवलेंना दर्पण तर, कोविड योध्यांचाही होणार सन्मान  

माजलगाव  : माजलगाव पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारा दर्पण पुरस्कार यावर्षी माजलगावचे पत्रकार तुकाराम येवले यांना जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी पत्रकार संघातर्फे कोरोनाकाळात आरोग्य सेवा देत गोरगरिबांप्रती निःस्वार्थ सामाजिक दायित्व निभावणाऱ्या व्यक्तींचाही “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा आमदार रोहित पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. शनिवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता राजस्थानी मंगलकार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजलगाव पत्रकारसंघाचे अध्यक्ष हरीश यादव यांनी केले आहे.


मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न माजलगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणदिनाचे औचित्य साधून दरवर्षी दर्पण, समाजभूषण पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी दर्पण पुरस्कारासह कोरोना योध्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. शनिवारी (ता. १६) होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यास आमदार रोहित पवार, आमदार प्रकाश सोळंके, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, नगराध्यक्ष शेख मंजूर, कार्यकारी संपादक भागवत तावरे, मा.आ. मोहनराव सोळंके, मा.आ. राधाकृष्ण होके पाटील, मोहन जगताप, रमेश आडसकर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

यांचा होणार सन्मान

पत्रकार तुकाराम येवले यांना दर्पण पुरस्कार तर,

 कोविड योद्धा पुरस्कार डॉ. गजानन रुद्रवार, डॉ. सुरेश साबळे, डॉ. अनिल परदेशी, डॉ. यशवंत राजेभोसले, डॉ. श्रेयेस देशपांडे, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. पूजा देशमुख, टेंबे गणेश मंडळ युवा ग्रुप, राजेश्री, राजेंद्र आनंदगावकर व मंजरथ ग्रामस्थ, सुरेंद्र रेदासनी, रियाज काझी, शेख बाबा, एकनाथ मस्के, शाम देशमुख, अझहर नाईक, नितीन क्षीरसागर यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश यादव, सचिव रत्नाकर कुलथे, जिल्हाउपाध्यक्ष सुभाष नाकलगावकर व सर्व सदस्यांतर्फे करण्यात आले आहे.

No comments