Breaking News

माजलगावमध्ये विषय समितीच्या निवडीवरून भाजप नगरसेविकांच्या नातेवाईकांमध्ये तू- तू, मैं- मैं

माजलगाव नगर परिषदेतील प्रकार :  पिठासीन अधिकाऱ्यांसमोरच घातला गोंधळ

विषय समित्यांची बिनविरोध झाली निवडी

बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

नगर परिषदेच्या दि २२ जाने शुक्रवार रोजी झालेल्या विषय समिती निवडणुकीत भाजप नगरसेविकांच्या नातेवाईकांनी आपसातच मोठा गदारोळ केल्याचा प्रकार पीठासीन अधिकारी यांच्यासमोर घडला. दरम्यान, शेवटी बिनविरोध समित्यांची निवड करण्यात आली आहे.

माजलगाव येथील नगर परिषद सभागृहात विविध विषय समित्यांच्या निवडीसाठी बैठकीचे दि २२ जाने शुक्रवार रोजी आयोजन पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड व मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. त्यावेळी सभागृहात नगरसेविका ऐवजी त्यांची मुले, पती हेच उपस्थित होते. महिला भाजप नगरसेवकांच्या या नातेवाईकांनी निवडीत कोणाचे नाव द्यायचे यावरून आपसातच एकमेकांच्या अंगावर धावून गदारोळ केला. सुमारे दहा मिनिटे हा प्रकार सुरू होता अखेर काही नगरसेवक व मुख्याधिकारी भोसले यांनी उठून मध्यस्थी केली. त्यानंतर काही अनुपस्थित असलेल्या महिला नगरसेविकाना घरून बोलावण्यात आले व नंतर बैठक झाली.

यांची झाली निवड

दरम्यान, बांधकाम सभापती - रोहन घाडगे, पाणीपुरवठा सभापती- शरद यादव, महिला व बालकल्याण सभापती- उषा बनसोडे, स्वच्छता सभापती-  सुमन मुंडे, शिक्षण सभापती- सय्यद राज अहमद, स्थायी समिती सदस्य म्हणून भागवत भोसले, तालेब चाऊस, स्वाती सचिन डोंगरे यांची निवड झाली. 
No comments