Breaking News

समाजातील प्रत्येक नागरिकाला अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी प्रबोधन अभियान : परळी जमात-ए-इस्लामी हिंदचा उपक्रम

शांती, एकात्मता आणी समाजाच्या प्रगतीसाठी या अभियानातून  मोठा बदल होईल- मोहम्मद शफी फारोखी

परळी  : समाजाला अज्ञान ,घृणा आणि भौतिकवादाच्या  अंधकारातून वाचविणे तसेच शांती, एकात्मता आणि समाजाची  प्रगती व्हावी या उद्देशाने  जमात-ए- इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे अंधारातून प्रकाशाकडे हे राज्यस्तरीय प्रबोधन अभियान २२ जानेवारीपासून राज्यभर राबविण्यात येणार आहे.


यानिमित्ताने परळी येथील जिजामाता उद्यान   परिसरातील  फूड जंक्शन येथे पत्रकार परिषदेत  जमात-ए-इस्लामी हिंदचे  भारतीय समाज विभागाचे सहाय्यक सचिव मोहम्मद शफी फारूखी  यांनी  माहीती  दिली. तसेच या अभियानातून इस्लाम धर्माविषयी सामान्य नागरिकांच्या मनातील गैरसमजुती दूर करण्यात येणार  आहे. कोरोना महामारीने भौतिकवादी लोकांचे डोळे उघडले आहे. या स्थितीमुळे त्यांचे सध्याचे विश्वास आणि कार्यशैली मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. म्हणून जीवन फक्त संपत्ती गोळा करण्याचे नाव नाही  व  भौतिक  उद्देशांच्या परिपूर्तीचे नाव नाही.  शेवटी विवेक आणि करुणेशिवाय कुठलेही सुख नाही.

२२ ते ३१ जानेवारी दरम्यान शहरातील प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयाला भेटी देणे, युवा व युवतींना माहीती देणे, वृद्धाश्रम व शहर व तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंच्या भेटी, सामाजिक व राजकीय व्यक्तीच्या भेटी, शाळा- काॅलेजला भेटी, महिलांना विशेष  मार्गदर्शन तसेच पुस्तक प्रदर्शन व  डाॅ. ह. भ. प. रफीक पारनेरकर यांचे व्याख्यान होईल. या अभियानातून माणसाला   अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचा प्रयत्न होणार असून शहरातील ५० हजार नागरिकांपर्यंत हा संदेश देण्यात येणार आहे. यावेळी जमातचे शहराध्यक्ष सय्यद अन्वर, जिल्हाध्यक्ष सय्यद इफ्तेखार यांची उपस्थित होती. सय्यद जाफर, सय्यद अफान, शेख मुदस्सीर, शेख अहमद यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार सय्यद सबाहत यांनी केले.


No comments