Breaking News

सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना स्वाभिमानाने जगण्यास शिकविले -डॉ स्मिता रुद्रवार


माजलगाव :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक विषमतेच्या विरोधात उभे राहून स्त्रीयांना शिक्षणाची दारे खुली करून दिली.  त्यांच्या या कार्यामुळेच आज स्त्रिया ह्या विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करत असून सावित्रीबाई फुलेमुळेच स्त्रिया स्वाभिमानाने जगत आहेत      असे प्रतिपादन डॉ. स्मिता रुद्रवार यांनी सुंदरराव सोळंके महाविद्यालययात बोलताना व्यक्त केले.

    सुंदरराव सोळंके महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ वगरे होते तर प्रमुख व्याख्यात्या म्हणून डॉ स्मिता गजानन रुद्रवार  होत्या. यावेळी प्राचार्य डॉ.व्ही.पी. पवार, उपप्राचार्य प्रकाश गवते, उपप्राचार्य पवनकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 'स्त्री शिक्षण व सद्यस्थिती' या विषयी पुढे बोलताना डॉ स्मिता रुद्रवार म्हणाल्या की, माणसाच्या परिवर्तनाचे साधन शिक्षण आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांना स्वाभिमानी केले असे सांगून पुरुषांनी स्त्रियांना विचारांचे स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले . 

     यावेळी प्राचार्य डॉ व्ही.पी. पवार यांच्यासह प्रा. संजय बागुल प्रा. वैशाली शहाणे,  अरुणा स्वामी, प्रा. वडमारे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आरती वाघमारे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर तयार केलेल्या भीती पत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटरचे समन्वयक सुदर्शन स्‍वामी, डॉ गणेश मोकासरे, प्रा डॉ अर्चना कचरे, प्रा. वच्छला भिसे, प्रा. व्ही.आर. पुरी, मीना डक, जी एस मुसळे ,एस आर शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना कचरे यांनी केले तर आभार प्रा. वैशाली शहाणे यांनी मानले कार्यक्रमाला विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

No comments