Breaking News

रोहित्राची जागा बदलल्याने विद्युत पुरवठा खंडित : लोणी सय्यदमीर येथील शेतकऱ्यांत संताप


*पूर्ववत जागी रोहित्र बसविण्यात न आल्यास

*महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा 

आष्टी :  रोहित्राची जागा बदलवून अन्य ठिकाणी बसविण्यात आल्याने लोणी सय्यदमीर येथील वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी शेतातील वीजपंप दोन महिन्यांपासून बंद पडले असून पिकांना पाणी देता नसल्याने पीके वाळत आहे. त्यामुळे रोहित्र पूर्ववत जागी पुन्हा बसविण्यात यावे. अन्यथा महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी महावितरणचे मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथील बाराबिघा शिवारातून रेल्वेरूळ गेला आहे. पूर्वीचे रोहित्र (कोड ः 4415981) रेल्वेरूळ भरावाच्या पश्चिमेस होते. परंतु रेल्वेरूळ भरावातील केबल निकृष्ट दर्जाची असल्यामुळे पूर्वेकडील शेतकर्‍यंनी महावितरणच्या कर्मचार्‍यांना न कळविता मनगटशाही करून वायरिंगचे काम करणार्‍या खासगी व्यक्तीला हाताशी धरून रोहित्राची जागा बदलली.

 याबाबत पश्चिम बाजूचे शेतकरी विचारविनिमय करण्यास गेले असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली. रोहित्राची जागा बदलल्याने वीजपुरवठा बंद असून, पश्चिमेकडील शेतकर्‍यांचे वीजपंप गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. शेतकर्‍यांच्या रस्त्याचा व वीजपुरवठ्याचा रेल्वे प्रशासनाने कोणताही विचार न केला नाही. महावितरणची परवानगी नसताना डीपीची जागा बदलण्यात आली असून, या प्रकाराची रितसर चौकशी करावी. दहा दिवसांच्या आत जुन्या जागेवर रोहित्र पूर्ववतन बसविल्यास वीजपुरवठ्यापासून वंचित शेतकरी महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा शेतकरी नारायण गावडे, विष्णू चोभे, सबाजी पवार, नारायण वाळके, तुकाराम वाळके, नवनाथ पवार, नवनाथ वाळके, संतोष देवकर, मारुती झावरे, भाऊसाहेब देवकर, बलभीम चोभे, सतीश वाळके, मच्छिंद्र वाळके यांनी दिला आहे.


No comments