Breaking News

धक्कादायक ! लोणीत पुन्हा आठ मोरांच्या मृत्युने खळबळ

मोराची संख्या तेरावर , वनविभागाचे अधिकारी मृत मोरांचे रक्तनमुने घेऊन पुण्याच्या प्रयोग शाळेत !

शिरूर कासार : जिल्ह्यात बर्ड फ्लूने दहशत माजवली असताना शिरूर कासार तालुक्यातील लोणीत पाच मोरांच्या मृत्यु कशाने झाला. याचा अहवाल अजून आलेला नसताना पुन्हा लोणीत ८ मोरांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून मोरांचा मृत्यू बर्डफ्लूने झाला की, नेमका कशाने यावर तर्क वितर्क लावले जात आहेत.

राज्यातील बहुतांश भागात बर्ड फ्ल्यू मुळे कावळे,कोंबड्या ,कबुतर या पक्षांचा मृत्यू झाल्याचे समोर येत असताना शिरूर तालुक्यातील लोणी शिवारात माळसोंडाच्या पायथ्याशी  तीन मोर व दोन लांडोर मृत पावल्याचे आढळून आले. दरम्यान  दुसऱ्या दिवशीही शनिवारी तब्बल आठ मोराचा मृत्यु झाल्याने राज्यभरात या घटनेनी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्यानंतर घटनास्थळी शिरूरचे पशुवैद्यकीय अधिकारी श्री.आघाव,वन अधिकारी कार्यालयातून सायमा पठाण,प्राणी मित्र सिद्धार्थ सोनवणे,श्री. बद्रीनाथ परजणे आदींनी भेट पाच मोरांचे रक्तनमुने घेऊन वनविभागाची टीम पुण्यात दाखल झाली असून या आठ मोरांचे नमुने लवकरच तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉ .आघाव यांनी सांगितले. या घटनेने राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून बर्ड फ्लू की आणखी काही हे अहवालानंतर समजेल. मृत मोरांची संख्या तेरावर पोहोचली आहे.

जंगलात गस्त वाढविण्याची गरज : सोनवणे

काल लोणी तालुका शिरूर कासार येथे पाच मोर मृत्युमुखी पडले होते.  आज पुन्हा त्याच ठिकाणी  पाच मोरांचा मृत्यू झालेला आहे. या मोरांचा मृत्यू नेमका कश्याने झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही .त्यामुळे शेजारीच असलेल्या नायगाव मयूर अभयारण्यातील मोरांना सुद्धा त्याचा धोका पोहोचू शकतो. त्यामुळे वनविभागाने त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असून जंगलामध्ये गस्त वाढवणे गरजेचे असल्याचे वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे म्हणाले.No comments