Breaking News

गाव तेथे शाखा आणि घर तेथे महिला शिवसैनिक तयार करणार -अ‍ॅड. संगिता चव्हाण

जिल्ह्यात शिवसेनेचे महिला संघटन सक्षम करण्यासाठी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी उचलला विडा

बीड : सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी झटणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. समाजातील महिलांना त्यांच्या पायावर उभे करून त्यांना सक्षम करण्यासाठी शिवसेना नेहमीच अग्रभागी असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार 2021 च्या वर्षात बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गाव आणि वार्ड तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक तयार करीत शिवसेना महिला आघाडीचे संघटन सक्षम करण्याचा संकल्प शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी केल आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीदिनी बीड जिल्हा शिवसेना कार्यलयातून जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, आरूण डाके, महिला जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांच्या उपस्थित महिला शिवसैनिकांच्या नोंदणीला प्रारंभ करण्यात आले.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकापासून मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि प्रश्नासाठी लढणारा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना होय. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब  यांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण’ या धोरणावर आणि विचारांवर चालणार पक्ष आहे. शिवसैनिकांचे प्रेरणास्थान, अखंड हिंदुस्तानचे कवचकुंडल शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ंठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना मराठवाडा संपर्कनेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, मराठावाडा समन्वयक विश्वनाथ जेरूरकर, संपर्कमंत्री संदिपान भुमरे यांच्या सुचनेवरून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, संपर्कप्रमुख आनंद जाधव महिला संपर्क प्रमुख संपदा गडकरी, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक तयार करीत शिवसेना महिला आघाडीचे संघटन सक्षम करण्याचा संकल्प करत जिल्ह्यात सर्वाधिक महिला शिवसैनिक नोंदणी करण्याचा विडा महिला जिल्हा प्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी उचलला असून त्यांच्या जयंती दिनापासून जिल्हा मध्यवर्ती शिवसेना कार्यालयातून 101 महिलांची नोंदणी करत महिला शिवसेना नोंदणीला प्रारंभ करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे महिला जिल्हा प्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण, फरजाना शेख, शांता राऊत, रेखा वाघमारे, संगिता वाघमारे, लक्ष्मी आडणे, सविता शेटे, लक्ष्मी गुरूकूल, ललिता आडाणे, चंदा पवार, मंदा गायकवाड, काजल गायकवाड, गया गायकवाड, शांता गायकवाड, चंदा इटकर, अर्चना चंद्रकांत करांडे, अरूणा दशरथ मोमीन, सिमा जाधव, मिना आडे, संजिवनी मदन वाघमारे, कमलबाई बालकिसन राठोड यांची उपस्थिती होती.
No comments