Breaking News

केज - मसाजोग रस्त्यावरील अपघातात इस्थळ येथील तरुणाचा मृत्यू


पंधरा दिवसांपूर्वी झालं होता त्याचा विवाह; गावात पसरली शोककळा 

 गौतम बचुटे । केज 

कार आणि दुचाकीची समोरा- समोर झालेल्या धडकेत दुचाकीने पेट घेतला तर दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना केज- मसाजोग रस्त्यावर रविवारी घडली. अपघातात मृत्यूपावलेल्या तरुण  हा केज तालुक्यातील इस्थळ येथील असल्याचे समजते. दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी त्याचा विवाह झाला होता आणि आज त्याच्यावर काळाने घाला घातल्याने गावावर शोककळा पसरली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने निघालेली मारुती कार  क्रमांक एमएच-२३ वाय-०१२१ केज पासून अवघ्या दीड कि. मी. अंतरावर आल्यानंतर समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. धडक होताच दुचाकीने पेट घेतला. यात दुचाकी अक्षरशः आगीत जळून खाक झाली होती. यात  दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू झाला. दुचाकी जळाल्याने अपघातात मृत्यूपावलेल्या दुचाकीस्वाराची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. अपघातात मृत झालेला तरुण हा केज तालुक्यातील इस्थळ येथील असल्याची माहिती समोर येत असून परमेश्वर गणेश नरवटे असं मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे समजते. 

परमेश्वर नरवटे (वय२७ इस्थळ ता. केज जि. बीड, ह.मु. नेवासा, जि. नगर) येथे परमेश्वरचा नेवासमध्ये फ्लॅश फोटो स्टुडिओ आहे.  पंधरा दिवसांपूर्वी त्याचा विवाह अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर येथील मुलीशी झाला होता.  त्याच्या वैवाहिक जीवनाला नुकतीच सुरवात झाली असतांना आज काळाने त्याच्यावर अशा प्रकारे झडप घातली. त्याच्या मृत्यूच्या बातमीने इस्थळ गावासह नेवासा ही सुन्न झाले आहे.

No comments