Breaking News

जिजाऊ रत्न’ पुरस्कार देऊन होणार कर्तृत्वान महिलांचा सन्मान

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

परळी : अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि संगम ग्रामपंचायत यांच्या वतीने 12 जानेवारी 2021 रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे व संगमच्या सरपंच वच्छलाबाई कोकाटे यांनी दिली.

परळी तालुक्यातील संगम येथे दि.12 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. या कार्यक्रमात परळी शहर व परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा ‘जिजाऊ रत्न’ पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. या सत्कारानंतर अंबाजोगाई येथील शिवव्याख्यात्या शिवमती ज्योतीताई राहुल शिंदे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी परळी पालिकेच्या नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे व सौ.सुरेखाताई मेनकुदळे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी, सौ.शोभाताई गंगाधरराव शेळके, नायब तहसिलदार डॉ.क्षीतिजा वाघमारे, पांगरीच्या सरपंच सौ.अक्षता सुशिल कराड, समाजसेविका कमलबाई राठोड, पाणी पुरवठा सभापती प्राजक्ता भाऊसाहेब कराड, टोकवाडीच्या सरपंच सौ.गोदावरी राजाराम मुंडे, डॉ.नेहा आर्शद शेख, सौ.शिल्पा अतुल रोडगे, सौ.स्वाती विलास ताटे, सौ.अन्नपूर्णा जाधव, सौ.वर्षाताई मगर, सौ.चेतना अजित गौरशेटे, सौ.माधुरी विजय मुंडे, संगिता दत्तात्रय चव्हाण, सौ.वर्षा बबन कोकाटेे या महिलांचा ‘जिजाऊ रत्न’ पुरस्कार देऊन गौरव  होणार आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह, फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, सरपंच वच्छलाबाई कोकाटे व त्यांच्या सहकार्यांनी केले आहे.

No comments